Punjab National Bank RD Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. अनेकजण सोने-चांदी यांसारख्या मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करत आहेत. काहीजण रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करत आहेत.
शिवाय बँकेची एफडी योजना आणि आरडी योजना हा असाच एक अतिशय महत्त्वाचा आणि लोकप्रिय प्रकार आहे.
बँकेच्या आरडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही खूपच अधिक आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या आरडी स्कीममध्ये अनेकजण गुंतवणूक करतात.
जर तुमचाही बँकेच्या आरडी स्कीम मध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल आणि तुम्ही कोणती बँक आरडी योजनेसाठी चांगले व्याज देते याच्या शोधात असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे.
कारण की, आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या RD विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या RD स्कीम मध्ये प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये जमा केले तर पाच वर्षांनी किती रिटर्न मिळणार याविषयी माहिती पाहणार आहोत.
पंजाब नॅशनल बँक किती व्याज देते
बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पब्लिक सेक्टर मधील पंजाब नॅशनल बँक पाच वर्षांच्या आरडीसाठी 6.5% या व्याजदराने व्याज ऑफर करत आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्ही या बँकेच्या पाच वर्षांच्या आरडी स्कीम मध्ये प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटी वर 7.09 लाख रुपये मिळणार आहेत.
यामध्ये तुमची गुंतवणूक सहा लाख रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित पैसे हे व्याजाचे राहणार आहेत. म्हणजेच या कालावधीत बँकेच्या माध्यमातून तुम्हाला 1.09 लाख रुपये व्याज मिळणार आहे.
मात्र बँकेच्या व्याजदरात जर बदल झाला तर गुंतवणुकीवर मिळणाऱ्या रिटर्न मध्ये देखील बदल होऊ शकतो.
निश्चितचं जर तुम्हाला बँकेच्या आरडी स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल तर पंजाब नॅशनल बँकेची पाच वर्षाची आयडी स्कीम देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.