Railway News : भारतात प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाते. याचे कारणही तसे खासच आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असतो. शिवाय, रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे नेटवर्क हे देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लांब रेल्वे नेटवर्क आहे. अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही कोपऱ्यात रेल्वेने सहजतेने पोहोचता येते.
परिणामी देशात रेल्वेच्या प्रवासाला विशेष पसंती मिळते. विशेष म्हणजे भारतात असे काही रेल्वे मार्ग आहेत ज्या रेल्वे मार्गांवर मोठे जंगल आणि उंचच-उंच पर्वतरांगा पाहायला मिळतात. या रेल्वे मार्गावरील सुंदरता प्रवाशांना मोहित करत असते. दरम्यान आज आपण भारतातील असेच पाच सुंदर रेल्वे मार्ग जाणून घेणार आहोत ज्याची सुंदरता प्रवाशांना खूपच आवडते.
कोकण रेल्वे मार्ग : महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्ग हा देशातील सर्वात सुंदर रेल्वे मार्ग आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या रेल्वे मार्गावर असणारी सुंदरता प्रवाशांचे मन मोहून घेत आहे. या रेल्वेमार्गानजिक असणारी मनमोहक सुंदरता, अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य शब्दात सांगणे अशक्य आहे. या रेल्वे मार्गावरून जर तुम्ही प्रवास केला तर तुम्हाला स्वर्गात आहात की काय अशी फिलिंग येणार आहे.
या रेल्वे मार्गावर जर तुम्ही मुंबई ते गोवा असा प्रवास केला तर अरबी समुद्राचे आणि पश्चिम घाटाचे मनमोहक सौंदर्य तुम्हाला तुमच्या नजरेत कैद करता येणार आहे. हिरवेगार जंगल, सुंदर नद्या, उंच टेकड्या, पशु पक्षांचा किलबिलाट, उंच डोंगरावरून आदळणारे सुंदर धबधबे, नद्यांचे पूल, रेल्वे मार्गावरील चित्त थरारक वळणे इत्यादी गोष्टी तुम्हाला आकर्षित करणार आहे.
दार्जिलिंग हिमालयन रेल्वे (नवीन जलपाईगुडी-दार्जिलिंग) : जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आपले भान हरपून जाते. हा रेल्वे मार्ग देखील त्यापैकीच एक आहे. या रेल्वे मार्गावरील सुंदरता तुमच्या डोळ्यांना खूपच भोवणार आहे. खरंतर ही नॅरोगेज रेल्वे ट्रॅक वर धावणारी टॉय ट्रेन खूपच विलोभनीय आहे. जे लोक दार्जिलिंगला फिरायला येतात ते नक्कीच या टॉय ट्रेनची राईड अनुभवतात.
दार्जिलिंग हे चहाच्या मळ्यांसाठी खूपच लोकप्रिय आहे. यासोबतच येथील ही टॉय ट्रेन देखील प्रवाशांना विशेष आकर्षित करते. ही सुंदर पर्वतांमधून जाते. यातून तुम्हाला लांबच लांब असलेल्या चहाच्या बागां पाहायला मिळतात. यामुळे जर तुम्ही केव्हाही दार्जिलिंग फिरण्याचा प्लॅन बनवला तर या टॉय ट्रेनच्या रायडींग चा अनुभव एकदा नक्कीच घ्या.
हिमालयीन राणी (कालका-शिमला) : या रेल्वे मार्गावर प्रवास करणे म्हणजे सर्वाधिक सुंदर प्रवासाची अनुभूती देतो. कालका ते शिमला हा जवळपास पाच तासांचा प्रवास आहे. मात्र तुम्हाला हे पाच तास केव्हा निघून जातील हे कळणार सुद्धा नाही. पाच तासाचा हा प्रवास एखादा सुंदर चित्रपट पाहण्यासारखा आहे.
या रेल्वे मार्गावरील सुंदरता तुम्हाला पाच तासांची जाणीव होऊ देणार नाही याची गॅरंटी आहे. या रेल्वे मार्ग लगत असणारे निसर्गसौंदर्य खूपच अप्रतिम आहे. याची सुंदरता शब्दात वर्णन करण्यासारखी नाही. या रेल्वे मार्गालगत असलेल्या सुंदर दऱ्या आणि हिरवेगार जंगल खूपच अप्रतिम आहे.
कांगडा व्हॅली रेल्वे (पठाणकोट-जोगिंदरनगर) : जर तुम्ही कधी पठाणकोट ते जोगिंदर नगर असा रेल्वेने प्रवास केला तर तुम्हाला या रेल्वे मार्गाची सुंदरता समजणार आहे. हा भारतातील सर्वात सुंदर रेल्वे मार्ग आहे. या मार्गावरून प्रवास करताना धोलाधर पर्वतरांगा पाहायला मिळतात. जर तुम्ही कधी या रेल्वे मार्गावर गेलात तर नक्कीच तुम्हाला या मार्गावर असणारी सुंदरता अनुभवता येणार आहे.
वाळवंटातील राणी (जैसलमेर-जोधपूर) : तुम्ही निसर्गरम्य सौंदर्य अनेकदा पाहिले असेल. तुमच्याजवळही अशी अनेक पर्यटन स्थळे असतील जे मनमोहक नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध असतील. मात्र वाळवंट देखील तेवढाच सुंदर असतो. कदाचित तुम्हाला ओसाड वाळवंट आवडत नसेल, पण या रेल्वे मार्गावर कधी गेला तर तुम्हाला वाळवंटाच्या सुंदरतेची देखील कल्पना येऊ शकणार आहे. अथांग वाळवंट, वाळवंटावर वाढणारे झुडपे, येथील वन्यजीव, आदिवासींचे सुंदर दृश्य इत्यादी तुम्हाला या रेल्वे मार्गावर पाहायला मिळणार आहे. यामुळे तुमचा हा काही तास चालणारा प्रवास तुम्हाला बोरिंग वाटणार नाही.