Rain Alert 2023 : सध्या राज्यासह संपूर्ण देशातील हवामानात बदल झाला आहे. देशातील काही राज्यांमध्ये कडाक्याची थंड पडत आहे तर काही ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे.
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. तर देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे.
अशातच आता भारतीय हवामान विभागाने आगामी सहा दिवस देशातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, मध्य भारतातील काही भागात, उत्तर पश्चिम भारतातील काही राज्यात पावसाची शक्यता आहे. या भागामध्ये येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे.
30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीमध्ये या संबंधित राज्यात पावसाची हजेरी लागणार असा अंदाज आहे. याशिवाय देशातील काही राज्यांमध्ये पुढील सहा दिवस पाऊस पडणार असा अंदाज आहे.
तमिळनाडू, पद्दुचेरी आणि कराईकल या भागात आगामी सहा दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणा मध्ये देखील आगामी काही दिवस पाऊस पडणार आहे.
यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहण्याची गरज आहे. या कालावधीत बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.
परिणामी शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे, आपल्या महाराष्ट्रातील बोलायचं झालं तर राज्यात सध्या थंडीची लाट आली आहे. ज
म्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यात बर्फवृष्टी होत असल्याने आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असल्याने आपल्या महाराष्ट्रात देखील थंडीचा जोर वाढत आहे.
विशेष म्हणजे आगामी काही दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आणि थंडीची लाट येणार आहे.