Rajyasabha MP Payment : आपल्यापैकी काहीजण नोकरी करत आहेत तर काहीजण स्वतःचा व्यवसाय करत आहेत. आपल्याला महिन्याकाठी एक निश्चित उत्पन्न मिळते. काही लोकांचे उत्पन्न निश्चित नसते मात्र तरीही त्यांना त्यांच्या उत्पन्नाचा एक फिक्स आकडा ढोबळमानाने सांगता येतो.
अशा परिस्थितीत, आमदार आणि खासदारांना किती पगार मिळतो असा प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. दरम्यान सध्या स्थितीला राज्यसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. यामुळे आज आपण राज्यसभा खासदारांना नेमका किती पगार मिळतो याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यसभा खासदाराला किती पगार मिळतो
राज्यसभा खासदारांना किती पगार मिळतो हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला राज्यसभेच्या खासदाराला प्रति महिना एक लाख रुपये एवढा पगार मिळतो.
याशिवाय इतरही अन्य भत्ते या सदस्यांना मंजूर केले जातात. समजा जर राज्यसभा सदस्य घरातूनच काम करत असतील तर त्यांना दर दिवशी दोन हजार रुपयांचा भत्ता मिळतो.
याशिवाय कार्यालयीन कामासाठी तसेच राज्यसभेशी संबंधित कामांसाठी प्रवास करण्याकरिता राज्यसभा खासदारांना कोणताही खर्च करावा लागत नाही.
म्हणजेच त्यांना मोफत प्रवास करता येतो. राज्यसभेशी निगडित कामांसाठी विमान, रेल्वे किंवा इतर अन्य साधनाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रवासाचा सर्व खर्च शासनाकडून केला जात असतो.
ट्रेन प्रवासासाठी राज्यसभा सदस्यांना एक स्पेशल पास दिला जातो. त्याचा वापर करून सदस्य कुठेही प्रवास करू शकतात. मात्र या पासचा वापर फक्त राज्यसभा सदस्यांनाच करता येतो.
तसेच सदस्याला आणखी एक पासं दिला जातो ज्याचा वापर करून सदस्य आपल्या परिवारासमवेत किंवा सहकाऱ्यासमवेत फर्स्ट क्लास एसी कोच मधून प्रवास करू शकतात. त्यांना मतदार संघ भत्ता देखील मिळतो. त्यांना निवासस्थान, वीज, पाणी, टेलिफोन आणि वैद्यकीय भत्ता देखील दिला जातो.
पेन्शन मिळते का ?
सरकारी कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे पेन्शन दिले जाते तशीच पेन्शन राज्यसभा खासदारांना देखील मिळते. जे राज्यसभा खासदार पाच वर्षांपेक्षा जास्त काळ राज्यसभेचे सदस्य राहतात त्यांना 25 हजार रुपयांची पेन्शन मिळते.
तसेच दरवर्षी दोन हजार रुपयांची पेन्शन मध्ये वाढ देखील केली जाते. याशिवाय जे राज्यसभा खासदार दहा वर्षांपेक्षा जास्त काळ राज्यसभेचे सदस्य राहतात त्यांना 35 हजार रुपयांची पेन्शन दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे.