Ram Mandir Airline Service : सध्या श्रीक्षेत्र अयोध्या विशेष चर्चेत आहे. येत्या 22 जानेवारीला श्रीक्षेत्र अयोध्या येथे तयार होत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित राहणार आहे. यामुळे सध्या प्रभु श्रीरामांची नगरी विशेष चर्चेत आली आहे.
या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. या सोहळ्याला जगातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर हजेरी लावणार आहेत.
विशेष म्हणजे प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीवरील या भव्य दिव्य राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर येथे करोडो रामभक्त दर्शनासाठी दाखल होणार आहेत.
अशा परिस्थितीत या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी भारतातील तीन नामांकित एअरलाइन्स कंपन्यांनी विमानसेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
इंडिगो एअरलाइन्स आणि स्पाइस जेट या तीन प्रमुख कंपन्या अयोध्येसाठी विमानसेवा सुरू करणार आहेत. विशेष म्हणजे राजधानी मुंबईवरून देखील अयोध्येसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
त्यामुळे मुंबई ते आयोध्या हा प्रवास गतिमान होणार आहे. खरे तर आयोध्या येथील विमानतळ 30 डिसेंबर 2023 ला सर्वासाठी खुले करण्यात आले.
या विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर सहा जानेवारीला इंडिगो कंपनीने दिल्ली ते आयोध्या दरम्यान विमानसेवा सुरू झाली. त्यानंतर या कंपनीने अहमदाबाद ते आयोध्या या दरम्यान विमानसेवा सुरू केली.
विशेष म्हणजे इंडिगो कंपनी आता 15 जानेवारी 2024 पासून मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर देखील ही विमानसेवा सुरू करणार आहे. विशेष म्हणजे स्पाईस जेट या कंपनीच्या माध्यमातून देखील मुंबईहून अयोध्येसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
ही कंपनी फेब्रुवारी महिन्यापासून या मार्गावर विमान सेवा सुरू करणार अशी माहिती समोर आली आहे. मुंबई ते आयोध्या या मार्गावरच स्पाइस जेट कंपनी आठवड्यातून सहा दिवस विमानसेवा पुरवणार आहे.
यामुळे मुंबईहून अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि गतिमान होईल अशी आशा व्यक्त होत आहे.