Ram Mandir Ayodhya Latest News : भारतासहित संपूर्ण जगातील रामभक्तांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी रामभक्तांच्या जिव्हाळ्याच्या अशा भव्य राम मंदिराच्या लोकार्पणाबाबत आहे. सध्या अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामजी यांच्या भव्य राम मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून मंदिराच्या लोकार्पणाबाबत देखील एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रभू श्रीरामांचे जन्मस्थळी अयोध्या येथे अतिशय भव्य असे राम मंदिर निर्माणाचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्ली दौऱ्यावर रवाना होत आहेत.
मीडिया रिपोर्ट नुसार उद्या पाच सप्टेंबर 2023 रोजी योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत सीएम योगी पीएम मोदी यांना राम मंदिर लोकार्पणाचे निमंत्रण देणार असल्याचे सांगितले जात आहे. राम मंदिराचे उद्घाटन अथवा लोकार्पण जानेवारी 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात केले जाणार आहे.
मात्र कोणत्या तारखेला होईल हे सुनिश्चित झालेले नाही. रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होणार असल्याने त्यांच्या सोयीनुसार तारीख निवडली जाणार आहे. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी जी तारीख सुनिश्चित करतील त्या दिवशी भव्य राम मंदिराचे लोकार्पण केले जाणार आहे.
उद्या सीएम योगी राम मंदिर उद्घाटनाच्या काही महत्त्वाच्या बाबींवर देशाच्या पंतप्रधानांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत राम मंदिर लोकार्पणाची तारीख देखील फिक्स होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. तथापि 15 जानेवारी ते 24 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये भव्य राम मंदिराचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे करण्याचे नियोजन आहे.
याचाच अर्थ जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोणत्याही तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान उद्या होऊ घातलेल्या सीएम योगी आणि पीएम मोदी यांच्या बैठकीत मंदिराच्या लोकार्पणाची तारीख फिक्स होणार आहे. दरम्यान प्रभू श्री रामचंद्रजींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.