Ration Card Anandacha Shidha News : रेशन कार्डधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील रेशन कार्डधारकांना पुन्हा एकदा आनंदाचा शिधा वितरित करण्याचा मोठा निर्णय राज्यातील वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून यामुळे राज्यातील करोडो रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील रेशन कार्डधारकांना गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आनंदाचा शिधा वितरित होणार आहे.
राज्यातील एक कोटी 69 लाख रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी 550 कोटी आणि 57 लाख रुपयांचा खर्च केला जाईल. विशेष म्हणजे यासाठीच्या खर्चाला देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच मान्यता मिळालेली आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, शिंदे सरकारच्या माध्यमातून राज्यातील अंत्योदय अन्न योजनेतील 25 लाख लाभार्थी, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब आणि 7.5 लाख शेतकरी या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. यामुळे या संबंधित लाभार्थ्यांना ऐन सणासुदीच्या दिवसात मोठा दिलासा मिळणार आहे.
‘आनंदाचा शिधा’ मध्ये काय-काय मिळणार ?
खरंतर 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अठराव्या लोकसभेसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होईल असा अंदाज आहे.
अशा परिस्थितीत, आगामी निवडणुकीत सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी राज्यातील शिंदे सरकारने गुढीपाडव्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाला आनंदाचा शिधा वितरित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
या आनंदाच्या शिध्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल मिळणार आहे. यासाठी रेशन कार्ड धारकांकडून शंभर रुपये घेतले जाणार आहेत.
म्हणजेच राज्यातील रेशन कार्डधारकांना शंभर रुपयात या 4 वस्तू वितरित होणार आहेत. यामुळे आगामी गुढीपाडव्याचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचा उत्सव सर्वसामान्यांना आनंदात साजरा करता येणार आहे.
सणासूदिच्या दिवसात शिंदे सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील गरिबांसाठी विशेष फायद्याचा ठरेल अशी आशा यावेळी व्यक्त होत आहे.