Ration Card News : जर तुम्हीही रेशन कार्ड धारक असाल, शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील गरीब लोकांसाठी कायमच नवनवीन योजना सुरू केल्या जातात. यात मोफत धान्य योजनेचा देखील समावेश आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या तिन्ही गरजा गरीब असो की श्रीमंत सर्वांच्याच आहेत. या गरजा भागवण्यासाठी आपण सर्वजण मेहनत करत असतो. मात्र अनेकांना पोटभर जेवण मिळेल एवढे देखील उत्पन्न मिळत नाही.
अशा परिस्थितीत देशातील गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी शासनाकडून कोरोनाच्या आधी रेशन कार्ड धारकांना तीन रुपये किलो दराने तांदूळ आणि दोन रुपये किलो गहू या दरात प्रति व्यक्ती पाच किलो धान्य पुरवले जात होते. पण ज्या कुटुंबाचे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांना 35 किलो धान्य दिले जाते.
म्हणजेच अंत्योदय रेशन कार्ड ज्यांचे असते त्या परिवारात कितीही सदस्य राहीले तरी देखील त्यांना 35 किलो धान्य मिळते. दरम्यान शासनाने कोरोना काळात देशभरातील लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयानुसार एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य मिळत आहे.
अंत्योदय गटातील नागरिकांना एका शिधापत्रिकेवर ३५ किलो धान्य, तर प्राधान्य गटातील नागरिकांना प्रतिव्यक्ती ५ किलो याप्रमाणे धान्य वितरित केले जात आहे. प्राधान्य गटातील दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ प्रति लाभार्थी याप्रमाणे धान्य मिळत आहे.
मात्र आता धान्य वितरणाच्या योजनेत थोडा बदल होणार आहे. आता प्राधान्य गटातील रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 1 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ मिळणार आहे. म्हणजेच आता लाभार्थ्यांना कमी गहू मिळणार आहे.
साहजिकच एक किलो गव्हात एक व्यक्ती महिनाभर कसं भागवणार? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणार आहे. पण ज्या लोकांचे अंत्योदय रेशन कार्ड आहे अशा लोकांना पूर्वीप्रमाणेच दहा किलो गहू आणि 25 किलो तांदूळ मिळणार आहे. एक जुलैपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती हाती आली आहे.
यामुळे आता गरिबांना केवळ भात खाऊनच दिवस काढावे लागतील की काय? हा प्रश्न सामान्य कष्टकरी जनतेच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. खरंतर महाराष्ट्रातील जनता ही तांदूळ ऐवजी गव्हाचे अधिक सेवन करते. त्यामुळे हा निर्णय राज्यातील गरीब लोकांसाठी तोट्याचाच सिद्ध होणार आहे.