RBI Action On BOI And Bandhan Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयच्या माध्यमातून नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने देशातील दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सदर बँकेच्या खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सदर बँकांमधील ठेवीदार या कारवाईमुळे विचलित झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन दिवसांपूर्वी अर्थातच बुधवारी एक निवेदन जारी केले आहे. यात मध्यवर्ती बँकेने देशातील दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती दिली आहे.
कोणत्या बँकेवर केली दंडात्मक कारवाई
आरबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ इंडिया आणि बंधन बँकेवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही नियमांचे पालन न केल्याबद्दल बँक ऑफ इंडियाला कोट्यावधीचा दंड ठोठावण्यात आला आहे.
बँक ऑफ इंडिया ला 1.4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावेच लागले आहे. याशिवाय, देशातील आणखी एका प्रायव्हेट बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील बंधन बँकेला 29.55 लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या निवेदनातून समोर आली आहे.
बँक ऑफ इंडियावर कारवाई करण्याचे कारण ?
RBI ने असे म्हटले आहे की, ‘ठेवीवरील व्याज दर’, ‘बँकांमधील ग्राहक सेवा’, ‘कर्जावरील व्याज दर’ आणि क्रेडिट माहिती कंपनी नियम, 2006 च्या तरतुदींचे उल्लंघन करण्यासंबंधी RBI निर्देशांचे पालन न केल्याबद्दल बँक ऑफ इंडियाला दंड ठोठावण्यात आला आहे.
ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
आरबीआयने बंधन बँक आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांवर दंडात्मक कारवाई केली असल्याने सदर बँकेच्या ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारवाईमुळे त्यांच्यावर काही विपरीत परिणाम होणार का ? असा सवाल ठेवीदारांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.
दरम्यान याच संदर्भात आरबीआयने स्पष्टीकरण देखील दिले आहे. आरबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याकडून दंड आकारला जातो.
तो दंड फक्त बँकांनाच भरावा लागतो. यामध्ये खातेदारांना कोणताही दंड भरावा लागत नाही. त्यामुळे या बँकांवर आरबीआयने लादलेल्या आर्थिक दंडाचा बँक ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
अर्थातच आरबीआयने केलेल्या या दंडात्मक कारवाईमुळे सदर बँकेतील ठेवीदारांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. फक्त नियमांचे पालन केले नाही यामुळे आरबीआयने ही कठोर कारवाई केली आहे. त्याचा कोणताच परिणाम ग्राहकांवर होणार नाही.