Rbi Rule : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांना विशेष चालना मिळाली आहे. आता नागरिक कॅश ऐवजी ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार करत आहेत. ऑनलाइन व्यवहारासाठी म्हणजेच डिजिटल व्यवहारासाठी आता यूपीआय पेमेंट एप्लीकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
प्रत्येक ठिकाणी यूपीआय पेमेंट एप्लीकेशन एक्सेप्टेबल देखील आहे. यामुळे यूपीआयने पेमेंट करण्याला विशेष पसंती मिळत आहे. बाजारात अनेक डिजिटल पेमेंट एप्लीकेशन आहेत.
फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे, पेटीएम अशा एप्लीकेशन बाजारात उपलब्ध असून या एप्लीकेशनचा वापर करून सर्वसामान्यांना आता सहजतेने डिजिटल पेमेंट करता येऊ लागले आहे.
त्याचा परिणाम म्हणून आता रोकड व्यवहारांमध्ये मोठी घट आली आहे. मात्र असे असले तरी आजही अनेक ठिकाणी चेकने पेमेंट करावे लागत आहे.
तसेच काही जण चेकनेचं पेमेंट स्वीकारतात. अशा परिस्थितीत भारतात जरी डिजिटल पेमेंट ॲप्लिकेशनचा आणि यूपीआयचा वापर वाढत असला तरी देखील चेक अर्थातच धनादेशचा वापर पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही.
दरम्यान आज आपण चेकशी संदर्भात एका महत्त्वाच्या नियमाविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण चेकच्या मागे केव्हा सही करावी लागते, कोणत्या धनादेशाच्या मागे सही करावी लागते याविषयी असलेले नियम थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या धनादेशाच्या मागे सही करावी लागते ?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकच धनादेशाच्या मागे सही करावी लागत नाही. काही मोजक्याच धनादेशाच्या मागे सही करावी लागते. चेकच्या मागे सही करण्याला बँकेच्या भाषेत एक विशेष अर्थ असतो.
यामुळे काही धनादेशांमागे सही करावी लागते. मिळालेल्या माहितीनुसार चेकचे एकूण 18 प्रकार आहेत. हे अठरा प्रकारचे चेक वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात.
मात्र या सर्वच चेकवर मागे सही करावी लागत नाही. जाणकार लोकांनी फक्त बिअरर चेकवर Bearer Cheque वर मागे सही करावी लागते असे सांगितले आहे.
हा चेक घेऊन येणाऱ्यास रोकड मिळते. कोण काय फारशी चौकशी होत नाही. मात्र मोठ्या रकमेचे बिअरर चेक बारकाईने पाहीले जातात.