Rent Agreement : देशात नोकरीच्या निमित्ताने गावाकडून शहरात तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग स्थायिक होत असतो. मात्र नवीन शहरात गेल्यानंतर सर्वप्रथम या तरुण वर्गापुढे प्रश्न उभा राहतो तो निवाऱ्याचा अर्थातच घराचा. नवीन शहरात गेल्यानंतर तरुण वर्ग भाड्याच्या घराच्या शोधात असतात.
अनेक लोक आपल्या घरात भाडेकरू ठेवत असतात. भाडेकरू ठेवताना मात्र भाडेकरार करावा लागतो. हा भाडेकर भाडेकरू व्यक्तींसाठी तसेच घरमालकांसाठी देखील महत्त्वाचा राहतो. याबाबत जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार भाडेकरार नेहमी 11 महिन्यांसाठी केला पाहिजे. खरंतर भाडेकरार हा 11 महिन्यांसाठीच करतात.
तसेच भाडेकरार करणे आवश्यक आहे नाहीतर भविष्यात तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तज्ञ लोक सांगतात की या करारात घरमालक आणि भाडेकरू यांच्या अटी या करारात लिहिल्या जातात. या दोन्ही व्यक्ती मग या संमतीपत्रावर सही करतात आणि हा करार या दोन्ही लोकांना मान्य करावा लागतो.
यामध्ये भाडे वाढ, दुरुस्ती, सुरक्षा ठेव, देखभाल आणि इतर देयके यासारख्या विविध बाबीचा उल्लेख केलेला असतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भाडेकरार का करावा. याबाबत अनेक लोकांनी प्रश्न विचारला होता. तज्ञ लोक या विषयी सांगतात की, तुम्हाला जर तुमचे घर किंवा इतर कोणतीही मालमत्ता 11 महिन्यांपेक्षा जास्त काळ भाडेकरूला द्यायची असल्यास, तुम्ही भाडेकरार केला पाहिजे.
जर तुम्ही 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी मालमत्ता भाडे तत्त्वावर देणार असाल तर कराराची आवश्यकता नाही. तूमच्या घराजवळील रजिस्ट्रार ऑफिसमध्ये तुम्हाला त्याची नोंदणी करावी लागेल. या कराराची नोंदणी केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. हा करार दोन्ही पक्षांच्या अधिकारांचे संरक्षण करतो.
भाडेकरारसाठी ऑनलाइन अर्ज कसा करणार ?
आपल्या राज्यात भाडे करार ऑनलाइन केला जात आहे. निश्चितच, भाडेकरारची सुविधा ऑनलाईन उपलब्ध असल्याने याचा राज्यातील नागरिकांना फायदा होत आहे. हा भाडेकरार करण्यासाठी तुम्हाला ई-फायलिंग वेबसाइटवर (https://efilingigr.maharashtra.gov.in/ereg/) जावे लागेल.
येथे तुम्हाला तुमचे प्रोफाइल तयार करावे लागणार आहे. प्रोफाइल तयार केल्यानंतर, घरमालकाला मालमत्तेची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. यामध्ये तुम्हाला गाव, तहसील, जिल्हा अशी सर्व माहिती द्यावी लागणार आहे.