Retirement Age : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष एवढे आहे. याशिवाय देशातील इतर 25 राज्य शासनातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे एवढेच आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्यातील गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील साठ वर्षे करण्यात आले आहे.
मात्र उर्वरित राज्य कर्मचाऱ्यांचे Retirement Age अजूनही 58 वर्ष एवढेच आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच राज्यातील सर्वच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे झाले पाहिजे अशी मागणी संबंधितांच्या माध्यमातून केले जात आहे.
यासाठी वारंवार शासनाकडे निवेदने देखील दिले जात आहे. आतापर्यंत राज्य शासनाला या संदर्भात शेकडो निवेदने प्राप्त झाले असतील.
विशेष म्हणजे या मागणीच्या पार्श्वभूमीवर संबंधितांच्या माध्यमातून सातत्याने आंदोलने देखील करण्यात आली आहेत. तथापि अजूनही राज्य कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण झालेली नाही.
मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या या मागणी संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि मोठे अपडेट दिली आहे. राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासन दरबारी विचाराधीन असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबतचा प्रस्ताव सध्या शासनाकडे विचाराधीन असल्याचे म्हटले होते. राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून दोन वर्षे वाढवून साठ वर्षे करणे बाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे विचाराधीन आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये राज्याच्या मुख्य सचिवांनी याबाबतचा प्रस्ताव सध्या स्थितीला शिंदे सरकारकडे विचाराधीन असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते.
मात्र राज्य शासनाकडे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून साठ वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असूनही याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
कर्मचाऱ्यांकडून याबाबतचा अंतिम निर्णय केव्हा घेतला जाईल असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी तरी याबाबतचा निर्णय होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकार याबाबतचा निर्णय घेऊ शकते ही शक्यता मात्र नाकारून चालत नाही. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून याबाबतचा अंतिम निर्णय केव्हा होणार या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.