Salary Of MP :- भारत हा लोकशाही असलेला देश असून जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. कित्येक वर्षापासून विकसनशील देशांच्या यादीमध्ये असलेल्या भारताची अर्थव्यवस्था आता झपाट्याने विकसित होत असून लवकरच जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख या जगात निर्माण होईल अशी शक्यता आहे. आपला भारतामध्ये संसदीय पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला असून त्यानुसार भारतातील प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती यांना ओळखले जाते तर पंतप्रधान हे देशातील सर्वात मोठे पदांपैकी एक पद आहे.
लोकसभा हे देशाचे प्रथम सभागृह असून यामध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना खासदार म्हणून संबोधले जाते हे आपल्याला माहिती आहे. या निवडून आलेल्या खासदारांमधूनच पंतप्रधानांची निवड केली जाते. हे झाले आपल्या भारताच्या संसदीय रचनेबद्दल. परंतु आपल्यापैकी कित्येक जणांच्या मनात प्रश्न येत असेल की भारतातील खासदार आणि पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांना किती पगार मिळत असेल किंवा कोणत्या सुविधा मिळत असतील? याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
पंतप्रधानांचे वेतन व त्यांना मिळणाऱ्या महत्त्वाच्या सुविधा
भारताच्या पंतप्रधान या पदावर असलेल्या व्यक्तीला प्रत्येक महिन्याला एक लाख 66 हजार रुपयापेक्षा जास्तीचे वेतन मिळते. त्यांचे मूळ वेतन बघितले तर ते 50 हजार रुपये असून याव्यतिरिक्त त्यांना तीन हजार रुपये खर्च भत्ता तसेच खासदार भत्ता म्हणून 45 हजार रुपये व दैनंदिन भत्ता 2000 रुपये इतका मिळतो. हे सर्व मिळणारे भत्ते मिळून एकूण महिन्याला 61 हजार रुपये भत्यापोटी मिळतात. पंतप्रधानांची निवृत्ती झाल्यानंतर त्यांना राहण्यासाठी बंगला तसेच पाच वर्षाकरिता मोफत रेल्वे सेवा, ऑफिस खर्चा करिता सहा हजार रुपये आणि खाजगी सचिव देखील मिळतो. एवढेच नाही तर मोफत वैद्यकीय सुविधा देखील दिली जाते.
भारतातील खासदारांना किती पगार मिळतो?
आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या खासदारांची निवड थेट नागरिकांच्या माध्यमातून केली जाते. या खासदारांना अधिनियम 1954 च्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये पगार मिळतो. एवढेच नाही तर खासदारांच्या पगारांमध्ये प्रत्येक पाच वर्षांनी दैनंदिन भत्त्याच्या स्वरूपामध्ये वाढ केली जाते. तसेच प्रति किलोमीटर 16 रुपये वेगळा भत्ता सुद्धा खासदारांना दिला जातो. मतदार संघाकरिता मतदार संघ भत्ता म्हणून प्रत्येक महिन्याला 70 हजार रुपये, ऑफिसच्या खर्चा करिता प्रति महिना सात हजार रुपये त्यांना मिळतात. या व्यतिरिक्त मोफत रेल्वे सुविधा व वैद्यकीय सुविधा मोफत दिली जाते.
राष्ट्रपतींना मिळणारा पगार व सुविधा
राष्ट्रपती हे तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख म्हणून ओळखले जातात. भारतात राष्ट्रपतींची निवड ही लोकसभा व राज्यसभेचे खासदार यांच्या माध्यमातून केली जाते. राष्ट्रपतींना मिळणाऱ्या वेतन बघितले तर ते पाच लाख रुपये इतके आहे. याव्यतिरिक्त त्यांना विविध प्रकारचे भत्ते देखील मिळतात. आयुष्यभर मोफत उपचाराची सुविधा व राहण्याचे सुविधा देखील दिली जाते. पदाच्या निवृत्तीनंतर राष्ट्रपतींना प्रत्येक महिन्याला दीड लाख रुपये पेन्शन देखील मिळते व स्टाफ करिता साठ हजार रुपये वेगळे देण्यात येतात.