Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर दरम्यान तयार होत असलेल्या समृद्धी महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात.
यामध्ये रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. अशा परिस्थितीत उपराजधानी नागपूर सहित संपूर्ण विदर्भातील जनतेला जलद गतीने मुंबईकडे जाता यावे यासाठी समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.
समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. या मार्गाचे आत्तापर्यंत 600 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून एवढा भाग वाहतुकीसाठी सुरू देखील झाला आहे.
डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाचा 520 किलोमीटर लांबीचा नागपूर ते शिर्डी हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. समृद्धी महामार्गाचा हा पहिला टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित झाला.
यानंतर या मार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गेल्या वर्षी लोकार्पित झाला.
म्हणजेच सध्या शिर्डी ते भरविर हा 600 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे.
विशेष म्हणजे भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाची तारीख देखील ठरली आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार या मार्गाचा तिसरा टप्पा अर्थातच भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा 23 किलोमीटर लांबीचा टप्पा हा 4 मार्चला सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाणार आहे.
एवढेच नाही तर इगतपुरी ते आमने हा समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा देखील लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या चौथ्या टप्प्याचे आत्तापर्यंत 90% पर्यंत काम पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील जलद गतीने सुरू आहे.
यामुळे हा चौथा टप्पा जुलै 2024 अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो असा आशावाद एमएसआरडीसीकडून व्यक्त केला जात आहे. अर्थातच जुलै महिन्यात संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.