SBI Bike Loan : तुमचेही रॉयल एनफिल्ड बाईक खरेदी करण्याचे स्वप्न आहे का ? हो मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची ठरणार आहे. खरे तर रॉयल एनफिल्ड ही देशातील एक लोकप्रिय टू व्हीलर निर्माती कंपनी आहे.
या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. रॉयल एनफिल्ड क्लासिक ही देखील एक लोकप्रिय बाईक म्हणून उदयास आली आहे.
या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. या गाडीची दिल्ली एनसीआर मध्ये ऑन रोड प्राईस दोन लाख पंधरा हजार रुपये एवढी आहे.
जर समजा तुम्ही ही गाडी खरेदी करण्याच्या तयारीत असाल आणि तुमच्याकडे गाडी खरेदी करण्यासाठी अपेक्षित असे भांडवल नसेल तर तुम्ही या गाडीसाठी कर्ज देखील घेऊ शकता.
जर तुम्ही एसबीआयकडून ही गाडी खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला या कर्जासाठी किती रुपयांचा हप्ता भरावा लागू शकतो हेच आज आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दोन लाखाच्या कर्जासाठी कितीचा हप्ता ?
Royal Enfield Classic गाडीची एक्स शोरूम किंमत दोन लाख पंधरा हजार रुपये एवढी आहे. ही गाडी खरेदी करण्यासाठी पुरेसे भांडवल नसेल तर तुम्ही यासाठी कर्ज घेऊ शकता.
जर तुम्ही या गाडीसाठी 15 हजार रुपये डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला दोन लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. दरम्यान हे दोन लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला एसबीआयकडून पाच वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध झाले तर तुम्हाला 4551 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच तुम्हाला पाच वर्षांच्या कालावधीसाठी 73 हजार रुपयांचे व्याज द्यावे लागणार आहे. म्हणजेच या लोन पिरियडमध्ये अर्थातच पाच वर्षांच्या कालावधीमध्ये दोन लाख 73 हजार रुपयांची परतफेड करावी लागणार आहे.
यामध्ये तुम्ही डाऊन पेमेंट केलेल्या 15,000 रुपयांचा समावेश राहणार नाही. सोबतच गाडीची ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.
ऑन रोड प्राईस मध्ये आरटीओ चार्जेस, इन्शुरन्स चार्जेस इत्यादीचा समावेश राहतो. यामुळे याची देखील किंमत तुम्हाला बाईक खरेदी करताना द्यावी लागणार आहे.