SBI FD News : जर तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर अलीकडे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
गेल्या काही महिन्यांमध्ये मुदत ठेव योजनेवरील व्याज दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने आता मुदत ठेव करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आधी महिला गुंतवणूकदार सोने आणि चांदी मध्ये गुंतवणूक करायला विशेष प्राधान्य दाखवत असत.
आता मात्र महिलांचा देखील माइंडसेट बदलला आहे. महिला वर्ग देखील आता मोठ्या प्रमाणात एफडी करण्याला पसंती दाखवत आहे.
दरम्यान, आज आम्ही एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण एसबीआयच्या एका विशेष एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
या एफडी योजनेत गुंतवणूकदारांनी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांचे पैसे डबल होणार आहेत, म्हणजेच पाच लाखाची गुंतवणूक 10 लाखांची होणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
SBI ची WeCare FD योजना
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयकडून वीकेअर एफडी योजना राबवली जात आहे. या अंतर्गत ग्राहकांना बँकेच्या इतर एफडी योजनांपेक्षा अधिक व्याजदर दिले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बँकेकडून 7.50% एवढे व्याजदर ऑफर केले जात आहे. या योजनेत किमान पाच वर्षांसाठी आणि कमाल दहा वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.
खरंतर बँकेच्या माध्यमातून दहा वर्षांच्या एफडीसाठी 6.5% एवढेच व्याज दर दिले जात आहे. पण, या विशेष एफडी योजनेसाठी 7.50% एवढे व्याजदर दिले जाणार आहे.
अशातच जर एखाद्या गुंतवणूकदारांने या एफडी स्कीममध्ये आत्ता दहा वर्षांच्या कालावधीसाठी 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर सदर गुंतवणूकदाराला तब्बल दहा लाख रुपये मिळणार आहेत, अर्थातच या योजनेतून पैसे डबल होणार आहेत.
मात्र या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंतच मुदत आहे. यानंतर या योजनेत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार नाही.