SBI Home Loan : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील पब्लिक सेक्टर मधील एक मोठी बँक आहे. या बँकेकडून ग्राहकांना स्वस्तात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी एसबीआय कडून स्पेशल होम लोन ऑफर दिली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे गृह खरेदीचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे.
खरे तर, गेल्या काही वर्षांपासून घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य घर खरेदीसाठी होम लोनचा आधार घेत आहे. मात्र होम लोनचे व्याजदर हे खूपच अधिक असल्याने अनेकांना होम लोन घेणे परवडत नाही.
मात्र एसबीआय कडून स्पेशल ऑफर अंतर्गत स्वस्तात होम लोन पुरवले जात आहे. एसबीआय बँकेकडून होम लोन वर 0.65 टक्क्यांपर्यंतची सूट दिली जात आहे. मात्र ही सूट सिबिल स्कोरच्या आधारावर उपलब्ध होत आहे.
अर्थातच ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांना स्वस्तात होम लोन उपलब्ध होणार आहे. दरम्यान एसबीआय कडून उपलब्ध करून देण्यात आलेली ही स्पेशल ऑफर 31 जानेवारी 2024 पर्यंतच कायम राहणार आहे.
म्हणजे 31 जानेवारीनंतर सवलतीच्या दरात एसबीआयच्या ग्राहकांना होम लोन मिळणार नाही. यामुळे जर तुम्हाला स्वस्तात होम लोन घ्यायचे असेल तर लवकरात लवकर एसबीआयच्या ब्रांच मध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
एसबीआयच्या या स्पेशल होम लोन ऑफर अंतर्गत सर्व प्रकारच्या होम लोनवरील व्याजदरात सवलत दिली जाणार आहे. मात्र या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे फक्त तीन दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे.
दरम्यान ग्राहकांना सिबिल स्कोरच्या आधारावर व्याजदरात सवलत दिली जाणार असल्याने आता आपण किती सिबिल स्कोर असला तर किती व्याजदर लागणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
किती सिबिल स्कोअर असला तर किती व्याज सवलत मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर 750-800 दरम्यान असेल अशा लोकांना, सवलतीशिवाय 9.15 टक्के (EBR+ 0 टक्के) व्याजदराने गृह कर्ज मिळणार आहे.
तसेच या ऑफरनुसार 8.60% व्याजदराने गृह कर्ज मिळणार आहे. याशिवाय सिबिल स्कोअर ७००-७४९ या दरम्यान असेल तर गृहकर्ज घेणाऱ्यांना 0.65 टक्के सवलत मिळणार आणि 8.70 टक्के (EBR-0.45 टक्के) एवढे व्याजदर आकारले जाणार आहे.
पण, सवलतीशिवाय हा दर 9.35 टक्के एवढा राहणार आहे. दुसरीकडे ज्या लोकांचा 700 पेक्षा कमी सिबिल स्कोर आहे त्यांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच कमी सिबिल स्कोर असलेल्यांना 9.45% व्याजदरात गृह कर्ज मिळणार आहे.