SBI Home Loan : होम लोन अर्थातच गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. जर तुम्हीही परवडणाऱ्या व्याजदरात गृहकर्जाच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर, अलीकडे सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँका आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
एसबीआय ही देखील बँक परवडणाऱ्या दरात गृह कर्ज देत आहे. एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे.
ही बँक आपल्या ग्राहकांना विविध कारणांसाठी कर्ज वापर करते. ही बँक घरासाठी देखील कर्ज देते. दरम्यान आज आपण एसबीआय बँकेच्या होम लोन ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
एसबीआय बँकेचे होम लोन साठीचे व्याजदर
एसबीआय गृह कर्जासाठी कमी व्याज वसूल करते. त्यामुळे अलीकडे अनेक जण एसबीआय कडून गृह कर्ज घेण्यासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळाले आहे.
जर तुम्हालाही एसबीआय बँकेकडून होम लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम एसबीआय बँकेचे होम लोन साठीचे व्याजदर माहिती असणे आवश्यक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना 9.15 टक्के व्याज दरात गृह कर्ज ऑफर करत आहे. मात्र हे बँकेचे किमान व्याजदर आहे. या व्याजदरात अशाच लोकांना कर्ज मिळणार आहे ज्यांचा सिबिल स्कोर खूपच चांगला आहे.
ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा 800 व 800 च्या आसपास असतो अशा लोकांना एसबीआय बँकेच्या किमान व्याजदराचा फायदा मिळतो.
30 लाखांचे गृह कर्ज घेतले तर कितीचा हप्ता?
समजा, तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाने तीस लाख रुपयांचे गृह कर्ज 9.15% व्याजदरात आणि पंधरा वर्षे कालावधीसाठी मंजूर केले तर तुम्हाला 30 हजार 696 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
या कालावधीत तुम्ही 25 लाख 25 हजार 329 रुपये व्याज स्वरूपात बँकेला देणार आहात. म्हणजेच मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण 55 लाख 25 हजार 329 रुपये तुम्हाला बँकेला द्यावे लागणार आहेत.
म्हणजेच तीस लाख रुपयांच्या प्रिन्सिपल अमाऊंटसाठी तुम्हाला तब्बल 25 लाख 25 हजार 329 रुपये 15 वर्षांच्या कालावधीत एक्स्ट्रा व्याजाच्या स्वरूपात द्यावे लागणार आहेत.