SBI New FD Scheme : एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये येत्या काही दिवसांनी एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे.

ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना सुरू करत असते. ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटमध्ये विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. तसेच वेगवेगळ्या एफडी योजना देखील बँकेकडून राबवल्या जात आहेत. एफडी करणाऱ्यांना बँकेकडून चांगला परतावा मिळत आहे.

Advertisement

दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी एसबीआय बँकेने अशीच एक एफडी योजना सुरू केली आहे. यामुळे जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी एसबीआय मध्ये एफडी करणार असाल तर तुम्हाला या योजनेची माहिती असायलाच हवी.

एसबीआयने कोणती नवीन एफडी योजना सुरू केली

Advertisement

SBI च्या या नवीन FD चे नाव अमृत वृष्टी असे आहे. ही योजना ४४४ दिवसांसाठी आहे. यामध्ये सामान्य ग्राहकांना गुंतवणुकीवर वार्षिक ७.२५% पर्यंत व्याज दिले जात आहे. मात्र या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांचा तुलनेत अधिक व्याज दिले जात आहे.

या योजनेत गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना ७.७५% या व्याजदराने परतावा दिला जात आहे. मात्र या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकदारांना लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागणार आहे. कारण की लवकरच ही योजना बंद होणार आहे.

Advertisement

बँकेने सांगितल्याप्रमाणे गुंतवणूकदारांना 31 मार्च 2025 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. मात्र तदनंतर ग्राहकांना या योजनेत पैसा गुंतवता येणार नाही. यामुळे जर तुम्हाला ही योजना आवडली असेल आणि यामध्ये पैसा गुंतवायचा असेल तर पुढील वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत यामध्ये पैसा गुंतवावा लागणार आहे.

ही योजना सामान्य ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना चांगला परतावा देत असल्याने लवकरच गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होणार अशी आशा आहे. याचा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक फायदा होणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *