SBI Personal Loan : एसबीआय ग्राहकांसाठी मोठी कामाची बातमी आहे. खरंतर एसबीआय ही देशातील बारा पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँकेपैकी एक आहे. पब्लिक सेक्टर अर्थातच सार्वजनिक क्षेत्रातील ही सर्वात मोठी बँक आहे.
बँकेचे करोडो ग्राहक असून बँकेकडून सवलतीच्या दरात ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. घर बांधण्यासाठी, वाहन खरेदी करण्यासाठी किंवा अन्य काही वैयक्तिक कारणांसाठी बँकेकडून स्वस्त दरात व्याज उपलब्ध करून दिले जात आहे.
यामुळे बँकेतील ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान, आज आपण एसबीआयकडून कोणत्या व्याजदरात वैयक्तिक कर्ज अर्थातच पर्सनल लोन उपलब्ध करून दिले जात आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
तसेच एसबीआयकडून जर 10 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले तर किती रुपये व्याज द्यावे लागणार या विषयी देखील माहिती पाहणार आहोत.
वैयक्तिक कर्जासाठी एसबीआयचे व्याजदर ?
आपल्यापैकी अनेकांना अचानक पैशाची गरज उद्भवली तर आपण सर्वप्रथम बँकेचे दरवाजे ठोठावत असतो. बँकेकडून सर्वसामान्य नागरिकांना पर्सनल लोन पुरवले जाते. तथापि, खूपच गरजेचे असेल तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा विचार केला गेला पाहिजे.
याचे कारण म्हणजे वैयक्तिक कर्ज हे खूप महाग असते. बँका यासाठी खूप अधिक व्याजदर आकरतात. एसबीआय बँक देखील ग्राहकांना परवडणाऱ्या दरात पर्सनल लोन उपलब्ध करून देत आहे.
बँकेकडून 11.55% व्याजदरात वैयक्तिक कर्ज ऑफर केले जात आहे. हे बँकेचे किमान व्याजदर आहे. म्हणजेच यापेक्षा जास्तीचे देखील व्याज द्यावे लागू शकते.
व्याजदर हा सिबिल स्कोरवर आधारित राहणार आहे. ज्यांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक आहे त्यांना किमान व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध होऊ शकते.
10 लाखाचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता
एसबीआय बँकेकडून जर 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज 5 वर्षाच्या टाईम पिरियडसाठी घेतले आणि किमान 11.55% दरात हे कर्ज उपलब्ध झाले तर 21,817 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
या कालावधीत कर्जदाराला 3.09 लाख रुपये एवढे व्याज द्यावे लागणार आहे. अर्थातच या कालावधीत 13.09 लाख रुपयांची परतफेड करायची आहे.