SBI Special FD Scheme : गुंतवणूकदारांपुढे अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध झाले आहेत. यामध्ये बँकेची एफडी योजना हा देखील एक उत्कृष्ट ऑप्शन आहे. खरंतर एफडी योजनेतून शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या तुलनेत खूपच कमी परतावा मिळतो.

मात्र येथील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. दुसरीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक ही थोडीशी रिस्की आहे. हेच कारण आहे की आजही अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजनेला विशेष महत्त्व दाखवतात.

Advertisement

रम्यान जर तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. आज आपण एसबीआयच्या एका स्पेशल एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

एसबीआयची चारशे दिवसांची एफडी योजना ठरणार फायदेशीर

Advertisement

एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 400 दिवसांची एक विशेष एफडी योजना आणली आहे.

या योजनेला अमृत कलश एफडी योजना असे नाव देण्यात आले आहे. या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% एवढे व्याज दिले जाणार आहे.

Advertisement

तथापि जेष्ठ गुंतवणूकदार असतील त्यांना 7.60% एवढे व्याज मिळणार आहे. अर्थातच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत एफडी करण्यासाठी 0.50 टक्के एवढी अधिकचे व्याजदर दिले जाणार आहे.

अमृत कलश एफडी योजनेत गुंतवणुकीसाठी अंतिम तारीख

Advertisement

एसबीआयने या विशेष FD योजनेत गुंतवणुकीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत दिली आहे. या एफडी योजनेत 31 मार्च 2024 नंतर गुंतवणूक करता येणार नाही.

यामुळे जर तुम्हालाही या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागणार आहे.

Advertisement

जर समजा या एफडी योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने चार लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर चार लाख 32 हजार 71 रुपये मिळणार आहेत. यात बत्तीस हजार 71 रुपये हे व्याज राहणार आहे.

जर समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत चार लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर चार लाख 34 हजार 400 रुपये मिळणार आहेत. अर्थातच ज्येष्ठ नागरिकांना चार लाखाच्या गुंतवणुकीवर 34 हजार 400 रुपयांचे व्याज मिळणार आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *