School Holidays : शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. खरे तर नुकतेच 2024-25 चे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे.
आता विद्यार्थी पुन्हा एकदा आपली स्कूल बॅग घेऊन शाळेत जात आहेत. शाळा सुरू झाल्याने आता पालक अन विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता प्राथमिक शिक्षण विभागाने या नुकत्याच सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात किती दिवस सुट्ट्या राहणार याची एक यादी दिली आहे.
या यादीनुसार या शैक्षणिक वर्षात रविवार पकडून तब्बल 124 दिवस शाळेला सुट्टी राहणार आहे. यात दिवाळीच्या सुट्ट्या या 12 दिवसांच्या राहणार आहेत. उन्हाळी सुट्ट्या 44 दिवसांच्या असतील. मुख्याध्यापकांच्या अधिकारात एका शैक्षणिक वर्षात दोन सार्वजनिक सुट्ट्या असतात.
यामधील एक सुट्टी ही गावच्या यात्रेसाठी असते आणि एक सुट्टी हे मुख्याध्यापक त्यांच्या विवेक बुद्धीनुसार जाहीर करतात. दरम्यान आता आपण सार्वजनिक सुट्ट्यांची यादी थोडक्यात पाहणार आहोत.
शाळेच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी खालील प्रमाणे
जून महिन्याच्या सुट्ट्या : १७ जून (बकरी ईद), २१ जून (वटपौर्णिमा)
जुलै महिन्याच्या सुट्ट्या : १७ जुलै (मोहरम, आषाढी एकादशी)
ऑगस्ट महिन्याच्या सुट्ट्या : १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन- पारशी नववर्ष), १९ ऑगस्ट (रक्षाबंधन)
सप्टेंबर महिन्याच्या सुट्ट्या : २ सप्टेंबर (पोळा), ७ सप्टेंबर (गणेश चतुर्थी), ११ सप्टेंबर (गौरीपूजन), १६ सप्टेंबर (ईद ए मिलाद), १७ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी)
ऑक्टोबर महिन्याच्या सुट्ट्या : २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), ३ ऑक्टोबर (घटस्थापना), १२ ऑक्टोबर (दसरा)
दीपावली सुट्टी : २८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर (दीपावली सुटी)
नोव्हेंबर महिन्याची सुट्टी : १५ नोव्हेंबर (गुरूनानक जयंती)
डिसेंबर महिन्याची सुट्टी : २५ डिसेंबर (ख्रिसमस, नाताळ)
जानेवारी महिन्याची सुट्टी : १४ जानेवारी (मकर संक्रांती), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)
फेब्रुवारी महिन्याची सुट्टी : १९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती), २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री)
मार्च महिन्याच्या सुट्ट्या : १४ मार्च (धूलिवंदन), १९ मार्च (रंगपंचमी), ३० मार्च (गुढीपाडवा, रमझान ईद)
एप्रिल महिन्याच्या सुट्ट्या : ६ एप्रिल (रामनवमी), १० एप्रिल (महावीर जयंती), १४ एप्रिल (डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती), १८ एप्रिल (गुडफ्रायडे)
मे महिन्याच्या सुट्ट्या : १ मे (महाराष्ट्र दिन)
उन्हाळी सुट्टी : २ मे ते १४ जून