Sister Property Rights : आज आपण वडीलोपार्जित संपत्ती बाबत महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला माहीतच असेल की संपत्तीचे दोन प्रकार पडतात. एक संपत्ती म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती. ही संपत्ती पिढ्यानपिढ्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते.
दुसरी संपत्ती म्हणजे स्वअर्जित संपत्ती, ही अशी संपत्ती असते जी एखाद्या व्यक्तीने स्वतः कमावलेली असते. दरम्यान आज आपण वडिलोपार्जित संपत्ती विषयी अनेकांच्या माध्यमातून विचारला जाणारा एक कॉमन प्रश्न व त्याचे उत्तर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर अनेकांकडून बहिणीला वडिलोपार्जित संपत्ती भावाप्रमाणे समान हिस्सा मिळतो का ? तसेच याचे उत्तर हो असे असेल तर कोणत्या कायद्यात याची तरतूद आहे याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बहिणीला भावाप्रमाणे वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान हिस्सा मिळतो का ?
हिंदू वारसा कायदा 1956 या कायद्यात याबाबतची महत्त्वाची तरतूद आहे. या कायद्यातील कलम 6 नुसार बहिणीला भावाप्रमाणे वडीलोपार्जित संपत्तीमध्ये समान हिस्सा देण्याची तरतूद आहे.
खरेतर हा कायदा 1956 मध्ये अमलात आला आणि यानंतर यामध्ये 2005 मध्ये सुधारणा झाली. सुधारणा होण्याआधी बहिणीला वडिलोपार्जित संपत्तीत जोपर्यंत ती अविवाहित आहे तोपर्यंतच अधिकार दिले जात असत.
मात्र 2005 नंतर जेव्हा या कायद्यात सुधारणा झाली तेव्हापासून बहीण विवाहित असली म्हणजेच बहिणीचे लग्न झालेले असले तरीदेखील तिला तिच्या माहेरच्या वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार प्राप्त होणार आहेत.
लग्नानंतरही बहिणीला भावाप्रमाणेच वडीलोपार्जित संपत्तीत समान अधिकार मिळतं आहे. अर्थातच बहीण विवाहित असो किंवा अविवाहित असो तिला तिच्या भावाप्रमाणेच वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार देण्याचे प्रावधान हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये करून देण्यात आलेले आहे.
स्वअर्जित संपत्तीत मात्र अधिकार नसतात
दुसरीकडे वडिलांच्या नावे असलेल्या स्वअर्जित संपत्ती बाबत मात्र वडिलोपार्जित संपत्ती पेक्षा वेगळे नियम आहेत. जर वडिलांच्या नावे असलेली संपत्ती वडिलांनी स्वतः कमावलेली असेल तर अशी संपत्ती वडील कोणालाही दान करू शकतात, कोणालाही देऊ शकतात.
अशा संपत्तीचा सर्वस्वी अधिकार वडिलांना असतो. जर वडिलांना अशी संपत्ती फक्त त्यांच्या मुलांनाच द्यायची असेल तर ते त्यांच्या मुलांना ही संपत्ती देऊ शकतात आणि मुलीला संपत्ती नाकारू शकतात.
तसेच जर अशी स्वअर्जित संपत्ती वडिलांनी मुलींना देण्याचा निर्णय घेतला तर मुलाला या विरोधात न्यायालयात जाता येणार नाही. अर्थातच स्वअर्जीत संपत्तीचा संपूर्ण अधिकार हा फक्त त्या व्यक्तीलाच असतो, ज्याने ती कमावलेली असते.