Sleeper Vande Bharat Train : मुंबई ही महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात खायतनाम आहे. दरम्यान मुंबई मधील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईला लवकरच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2019 मध्ये रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात केली होती. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली.
यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. विशेष बाब अशी की यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. तसेच यातील सहा वंदे भारत एक्सप्रेस या मुंबईमधून धावत आहेत.
देशात सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद दिला जात आहे. वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या एक्सप्रेस ट्रेनच्या धर्तीवर आता वंदे भारत स्लीपर वर्जन देखील लवकरच लॉन्च केले जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार सुरुवातीच्या टप्प्यात ही वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबईला देखील दिली जाणार आहे. मुंबई ते भोपाळ आणि अयोध्या ते भोपाळ या मार्गांवर ही वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.
विशेष म्हणजे याची चाचणी जुलै 2024 मध्ये सुरू होणार आहे. चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास जलद होईल अशी आशा आहे.
लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर जे नवीन सरकार केंद्राच्या सत्तेत येईल ते नवीन सरकार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार अशी माहिती समोर आली आहे. Sleeper वंदे भारत एक्सप्रेस मध्ये 15 कोच राहणार आहेत. या गाडीने प्रवाशांना झोपून प्रवास करता येणे शक्य होणार आहे.