Small Business Idea Marathi : अलीकडे नोकरीवर तुळशीपत्र ठेवून स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेकांना आता नोकरीमध्ये फारसा रस वाटत नाहीये. यामुळे अनेकजण नोकरी सोडून व्यवसाय करत आहेत. तसेच काहीजण नोकरी सोबतच व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. कोरोना काळापासून व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आधी व्यवसाय म्हणजे फक्त गुजराती लोकांची मक्तेदारी असा समज होता.

गुजराती लोकांनीच व्यवसाय करावा अशी धारणा मराठी माणसांमध्ये होती. अनेक लोक जाणूनबुजून मराठी माणूस व्यवसाय करूच शकत नाही असे बिंबवत असत. आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे मराठी माणसांनी देखील उद्योगात आपले कसब जगाला दाखवून दिले आहे. अनेक नवयुवकांनी व्यवसायात चांगली नेत्रदिपक कामगिरी करत साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे.

Advertisement

दरम्यान जर तुम्हीही आगामी काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फायदेशीर ठरणार आहे. कारण की, आज आपण फक्त 50,000 च्या गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या टॉप 3 व्यवसायांची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

लोणचे बनवण्याचा व्यवसाय : भारतात खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता पाहायला मिळते. मात्र असे असले तरी आपल्या देशात लोणचे हे प्रत्येकाच्या घरात असते. विविध फळांचे लोणचे बनवले जाते. पूर्वी अनेकलोक घरीच लोणचे बनवत असत. मात्र आता वेळेअभावी प्रत्येकाला घरी लोणचे बनवणे जमत नाही. यामुळे मार्केटमधून लोणचे खरेदी केले जाते. यामुळे जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

Advertisement

चांगल्या क्वालिटीचे आणि विविध फळांचे लोणचे बनवून तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन मार्केटमध्ये सेल करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे ब्रॅण्डिंग करावे लागणार आहे. जर तुम्ही बनवलेले लोणचे स्वादिष्ट असेल आणि चांगल्या क्वालिटीचे असेल तर नक्कीच तुमचा ब्रँड मोठा होणार आहे.

फूड सेक्टर हे एक असे सेक्टर आहे जे कधीच मंदीत राहत नाही. यामुळे हा व्यवसाय देखील कधीच मंदीत येणार नाही. विशेष बाब अशी की हा व्यवसाय अवघ्या 50 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो. यासाठी तुम्हाला कुठेच गाळा किंवा दुकान विकत अथवा भाडेतत्त्वावर घ्यावे लागणार नाही. हा व्यवसाय तुम्ही राहत असलेल्या घरातूनच सुरू केला जाऊ शकतो.

Advertisement

कपड्यांचा व्यवसाय : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. या तीन गरजा भागवण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत घेत असतो. यामुळे जर तुम्हाला नजीकच्या काळात एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही कपड्यांचा व्यवसाय सुरू करायला हवा. हा व्यवसाय तुम्ही सुरवातीला छोट्या स्तरावर सुरू करू शकता.

जर तुम्हाला कपड्यांचे दुकान सुरू करायचे असेल तर तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या शहरातील बाजारपेठेत एक दुकान भाडेतत्त्वावर घ्यावे लागणार आहे. यासाठी तुम्हाला छोटीशी रक्कम डिपॉझिट म्हणून द्यावी लागू शकते. तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मॅन्युफॅक्चररकडून होलसेल मधून कपडे आणावे लागणार आहेत. हा व्यवसाय तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुरू करू शकता.

Advertisement

ऑनलाइन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःची वेबसाईट डेव्हलप करू शकता. नाहीतर मग अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या विविध शॉपिंग साइटवर तुम्ही तुमचे कपडे विकू शकता. ट्रेंडिंगला असणारे कपडे विकून तुम्ही चांगली कमाई करू शकणार आहात. हा व्यवसाय देखील 50 हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो.

नाश्ता सेंटर : जर तुम्हाला उत्तम स्वयंपाक बनवता येत असेल तर तुम्ही स्वतःचे फूड स्टॉल सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला एक फूड ट्रक बनवायचा आहे. तुम्ही तुमच्या भागात जे पदार्थ नाश्त्यासाठी खाल्ले जातात ते पदार्थ तयार करून विकायला हवेत. वडापाव, मिसळ, पाववडा, भज्जी, सॅन्डविच किंवा चायनीजमध्ये नूडल्स, राईस, सोयाबीन चिल्ली असे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ तुम्ही तुमच्या फूड स्टॉलमध्ये बनवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *