Small Business Idea : तुम्हीही नजीकच्या भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. आज आपण बाराही महिने चांगले पैसे कमवून देणाऱ्या व्यवसायाबाबत माहिती पाहणार आहोत. भारतात कांद्याला नेहमीच मागणी असते. आपल्या देशात कांदा कच्चा खाण्यासाठी तसेच स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

कोणतीही भाजी असो त्यामध्ये कांदा हा असतोच. नॉनव्हेज जेवणात तर कांद्याचा सर्वात जास्त वापर होतो. यामुळे बकरी ईद व इतर सणासुदीच्या दिवसांमध्ये कांद्याची मागणी वाढत असते. फक्त हिंदू सनातन धर्मात काही सणांमध्ये कांदा खाणे वर्ज्य आहे. अशावेळी बाजारात कांद्याची मागणी कमी होत असते.

Advertisement

जसे की नवरात्रीच्या कालावधीत बहुतांशी हिंदू कुटुंबांमध्ये कांद्याचे सेवन होत नाही. त्यामुळे या काळात कांद्याची मागणी कमी होते. नाहीतर कायमस्वरूपी कांद्याला मागणी असते. मात्र या कांद्याला कधी बाजारात खूपच जास्त भाव असतो तर कधी बाजारात खूपच कमी भाव असतो.

अशावेळी जेव्हा जास्त भाव असतो तेव्हा ग्राहक थेट कांदा खरेदी करण्याऐवजी कांद्याची पेस्ट खरेदी करण्याला अधिक पसंती दाखवतात. त्यामुळे कांद्याची पेस्ट बनवण्याचा व्यवसाय हा एक फायद्याचा व्यवसाय ठरणार आहे.

Advertisement

दरम्यान आज आपण या व्यवसायाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल लागू शकते आणि यातून किती कमाई होणार यासंदर्भात आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

किती गुंतवणूक करावी लागणार ?

Advertisement

एका अहवालानुसार, कांदा पेस्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास चार लाख वीस हजार ते चार लाख 50 हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागणार आहे.

यात इमारतीचे शेड बांधण्यासाठी 1 लाख रुपये आणि या व्यवसायासाठी आवश्यक असणारे उपकरणे जसे की फ्राइंग पॅन, ऑटोक्लेव्ह स्टीम कुकर, डिझेल भट्टी, निर्जंतुकीकरण टाकी, छोटी भांडी, मग, कप इत्यादी खरेदी करण्यासाठी 1.75 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.

Advertisement

याशिवाय व्यवसाय चालवण्यासाठी म्हणजेच वर्किंग कॅपिटल म्हणून पावणेतीन लाख रुपये अर्धा तास 2.75 रुपये लागणार आहेत. अशा तऱ्हेने हा व्यवसाय चार लाख वीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकणार आहे.

किती कमाई होणार?

Advertisement

जर तुम्ही चार लाख वीस हजार रुपये खर्च करून हा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही एका वर्षात साडेसात लाख रुपयांचा माल विकू शकणार आहात. सर्व खर्च वजा करता जवळपास 1.75 लाख रुपयांचा तुम्हाला फायदा होणार आहे मात्र हा नफा ग्रॉस सरप्लस राहील.

निव्वळ नफा हा दीड लाखाचा राहू शकतो. अर्थातच सर्व खर्च वजा करता तुम्ही या व्यवसायातून वार्षिक दीड लाख रुपये कमवू शकता. विशेष म्हणजे व्यवसाय चांगला सुरू झाल्यानंतर तुम्ही या व्यवसायाची व्याप्ती वाढवू शकता आणि साहजिकच मग यातून मिळणारा नफा देखील वाढणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *