Smartphone Price : उद्या अर्थातच एक फेब्रुवारी 2024 ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प 2024-25 उद्या सादर होणार आहे. केंद्रातील मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प उद्या सादर करणार आहे.
खरेतर, हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांसाठी या बजेटमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
विशेष बाब म्हणजे बजेट सादर होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे भारतात आता मोबाईल फोनच्या किमती कमी होणार आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारने मोबाईल फोन प्रोडक्शन मध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आयात शुल्कात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
याचा परिणाम म्हणून आता देशात लवकरच मोबाईल फोन स्वस्त होणार अशी आशा व्यक्त होत आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्र शासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला असल्याचे बोलले जात आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की केंद्रातील मोदी सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील म्हणजे मोबाईल फोनच्या की कंपोनन्टवरील आयात शुल्क अर्थातच इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत मोबाईल फोनच्या की कंपोनंटसाठी 15 टक्के एवढे आयात शुल्क आकारले जात होते. आता मात्र या शुल्कात पाच टक्क्यांची कपात करण्याचा मोठा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे.
त्यामुळे यापुढे आता मोबाईल फोन प्रोडक्शन मध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आयातीसाठी 10 टक्के एवढे आयात शुल्क वापरले जाणार आहे.
मोबाईल फोनसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट करण्यात आली असल्याने भविष्यात स्मार्टफोनच्या किमती कमी होणार असल्याची आशा व्यक्त होत आहे. येत्या काळात मोबाईल फोन स्वस्त होणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.