Snake Bite:- जगात आणि भारतामध्ये सापाच्या अनेक प्रजाती असून त्यातील बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी वर्गातील आहेत. अगदी कमीत कमी जाती या विषारी आहेत. हीच परिस्थिती भारतात देखील असून भारतातल्या ज्या काही सापांच्या जाती आहेत त्यामध्ये विषारी जाती अगदी कमी आहेत.
जर आपण भारतात आढळणाऱ्या विषारी जातींचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने कोब्रा, मन्यार, घोणस आणि फुरसे या जातींचा आपल्याला उल्लेख करता येईल. जर आपण सापांचा विचार केला तर नुसता आपल्याला डोळ्यांना जरी साप दिसला तरी आपण भीतीने सैरावैरा धावायला लागतो.
कारण साप चावला म्हणजे मृत्यू ही एक भीती आपल्या मनात कायम असते. परंतु जर साप चावल्याचा विचार केला तर यामध्ये जितके साप चावल्यानंतर मृत्यू होतो त्यापेक्षा सर्पदंश झाल्यानंतर भीतीनेच माणूस मरतो असे म्हटले जाते. परंतु यामध्ये साप चावला तर योग्य वेळेत ताबडतोब उपचार जर मिळाले तर 80 टक्के पर्यंत व्यक्ती वाचू शकतो.
परंतु बऱ्याचदा साप चावल्यानंतर ग्रामीण भागामध्ये अनेक नको त्या गोष्टी केले जातात व आवश्यक उपचार करण्यामध्ये वेळ लागतो व व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे जर सर्पदंश झाला तर कुठली गोष्ट करू नये हे आपल्याला माहीत असणे तितकेच गरजेचे आहे. संबंधीची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
सर्पदंश झाल्यास या गोष्टी करू नये
1- आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागामध्ये अजूनही साप जर चावला तर सगळ्यात अगोदर मांत्रिकाला बोलण्याला प्राधान्य दिले जाते. परंतु असे न करता शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार कसे मिळतील याचा विचार करून ताबडतोब उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मांत्रिकाच्या मागे लावून वेळ वाया घालवू नये.
2- बऱ्याचदा ज्या ठिकाणी साप चावला आहे किंवा साप चावल्यानंतर आपण एखादी फडक्याने किंवा तत्सम गोष्टीने आवळा पट्टी बांधत असतो. परंतु अशा पद्धतीने पट्टी बांधताना रक्त प्रवाह थांबेल अशा पद्धतीने कुठल्याही अवयवाला आवळपट्टी बांधू नये.
असे केल्याने अवयवाचा रक्तपुरवठा थांबण्याची शक्यता वाढते. समजा जर दोन तासांपेक्षा जास्त कालावधी करिता अशी आवळपट्टी जर हाताला बांधली तर हात काळा पडतो व शेवटी कायमचा गमवावा देखील लागू शकतो.
3- साप चावल्यानंतर ज्या ठिकाणी जखम झालेली असते त्या ठिकाणचे रक्त काढू नये किंवा जखमेला कापण्याचा प्रयत्न अजिबात करू नये किंवा तिला चोखु देखील नाही. या काही गोष्टी केल्या तरी यांचा फायदा न होता नुकसान जास्त होऊ शकते. अजूनही ग्रामीण भागामध्ये असा समज आहे की ज्या ठिकाणी साप चावला आहे
अशा ठिकाणी जर एखाद्या धारदार वस्तूने कापले व दूषित रक्त काढले तर फरक पडतो. परंतु अशी कुठलीही गोष्ट करत बसू नये वर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करा.
4- बऱ्याचदा साप चावल्यानंतर लोक एकामागे एक कोंबड्यांचे गुद्दार जखमेला दाबून लावतात. परंतु यामुळे देखील कुठलाच फायदा होत नाही तर फक्त कोंबड्या मरतात.
5- त्यामुळे वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी टाळणे गरजेचे आहे व शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार घेण्याचा प्रयत्न करावा.
6- योग्य व ताबडतोब शास्त्रीय प्रथम उपचार जर मिळाला तरी रुग्णाचा जीव वाचू शकतो. कुठल्याही प्रकारचे तंत्र मंत्र किंवा नवस केल्यामुळे सापाचे विष कमी होत नाही.
जर आपण साप चावल्याने मृत्यू झाल्या मागचे एक सत्य पाहिले तर 90% लोकांचा जीव हा साप विषारी नसल्यामुळेच वाचतो. बहुसंख्य मृत्यू हे साप चावण्याचे भीतीनेच होऊ शकतात. त्यामुळे ज्याला साप चावला आहे त्या व्यक्तीला धीर देणे गरजेचे असून लवकरात लवकर वैद्यकीय उपचाराची सोय करणे महत्त्वाचे आहे.
विषारी साप कसा ओळखावा?
1- नाग– नाग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जो फणा काढून उभा राहतो व त्यालाच आपण नाग म्हणत असतो. जर तुम्ही सायकलच्या ट्यूबमधून हवा काढली व तेव्हा त्या हवा काढल्याचा जसा आवाज येतो अगदी त्याचप्रमाणे नाग आवाज काढत असतो.
2- मण्यार– हा साप रंगाने काळसर असतो व त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. याचे डोक्याकडे जाडी कमी असते तर शेपटीकडे जास्त असते.
3- घोणस– घोणस जातीचा साप कुकरच्या शिट्टी प्रमाणे आवाज काढत असतो व त्याच्या अंगावर साखळ दंडासारखे काळ्या रंगाचे ठिपके असतात व रेषा देखील असतात. या जातीच्या सापाच्या डोक्यावर इंग्रजी व्ही अक्षर असते.
4- फुरसे– फुरसे जातीचा साप हा साधारणपणे एक फुट लांब असतो व त्याच्या शरीरावर नक्षीकाम केल्यासारखी मार्किंग असते व डोक्यावर बाणासारखी खूण असते व करवतीसारखा करकर आवाज करतो.