Snake Bite First Aid : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर पावसाचा सर्वात जास्त जोर पाहायला मिळतोय. विदर्भात सुद्धा पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अशा या परिस्थितीमुळे साप, विचू अशा विषारी प्राण्यांची भीती वाढली आहे. खरे तर दरवर्षी पावसाळ्याच्या सीझनमध्ये विंचू चावण्याच्या अन सर्पदंशाच्या घटना वाढत असतात. एका शासकीय आकडेवारीनुसार, दरवर्षी संपूर्ण भारतात 58 हजार लोक सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडतात.

Advertisement

विशेष म्हणजे ही अधिकृत आकडेवारी आहे मृतांची संख्या याहीपेक्षा अधिक असू शकते. यामुळे सर्पदंशापासून स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे. विशेषता पावसाळ्याच्या सीझनमध्ये साप बिळाबाहेर पडतात अन यामुळे सर्पदंश होण्याची शक्यता अधिक असते.

खरे तर भारतात विविध जातीचे साप आढळतात. मात्र यापैकी फक्त काही बोटावर मोजण्याइतक्या सापाच्या जाती विषारी आहेत. तथापि सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आपल्या भारतात अधिक आहे. यामुळे आज आपण सर्पदंश झाल्यानंतर सर्वप्रथम काय केले पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

विषारी साप चावल्यानंतर सर्वप्रथम काय करणार?

पावसाळ्याच्या सीझनमध्ये दरवर्षी सर्पदंशाच्या घटना वाढत असतात यामुळे या काळात नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. जर समजा एखाद्याला साप चावला असेल तर ताबडतोब काही गोष्टी करायला हव्यात. जसे की, सर्पदंश झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात विष पसरू नये म्हणून त्याला ताबडतोब भरपूर तूप प्यायला द्यावे, ज्यामुळे त्याला उलट्या होतील.

Advertisement

उलट्या होण्यासाठी, तुम्ही त्याला 10 ते 15 वेळा कोमट पाणी सुद्धा प्यायला लावू शकता. कंटोल्याची भाजी जर उपलब्ध असेल तर लगेच ती रानभाजी बारीक करून जखमेवर लावली पाहिजें. यामुळे विषाचा प्रभाव कमी होतो आणि संसर्गाचा प्रसार रोखला जातो.

विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी लसणाची पेस्ट मधात मिसळून सर्पदंश झालेल्या भागावर लावली पाहिजें. तसेच त्या व्यक्तीला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल केले पाहिजे. जखमी भागातून रक्तस्त्राव होत असल्यास, ते थांबवण्याचा प्रयत्न करू नका, रक्त वाहू द्या. फक्त पीडितेला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

Advertisement

सर्पदंश झाल्यास, हॉस्पिटलमध्ये अँटीव्हेनम इंजेक्शन दिले जाते, ज्यामुळे सापाच्या विषाचा प्रभाव नाहीसा होतो. शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन रुग्णाला देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही साप चावल्यानंतर लवकरात लवकर हे काम केले तर सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *