Snake Information : सध्या पावसाळ्याचा सिझन सुरू आहे. यामुळे साप मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहेत. खरे तर सापाला पाहून आपला चांगलाच थर काप उडत असतो. प्रत्येकचं जण सापाला घाबरत असतो. भारतात सापाच्या शेकडो प्रजाती आढळतात. या सर्वच प्रजाती विषारी नसतात. सापाच्या काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी असल्याचे आढळले आहे.

मात्र, विषारी सापांच्या चाव्यामुळे दरवर्षी भारतात 50000 हुन अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. सर्पदंशाच्या घटना या पावसाळ्यात सर्वात जास्त होत असतात. याचे कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी शिरते आणि सापाला नाईलाज म्हणून बिळाबाहेर पडावे लागते.

Advertisement

अशावेळी सर्वत्र जमीन ओली असते. यामुळे साप घरात किंवा घराशेजारी अडगळीच्या खोलीत शिरतो. जे लोक जंगलाशेजारील घरात राहतात किंवा शेतात घर बांधून राहतात अशा लोकांना घरात साप घुसेल अशी भीती कायम वाटतं असते.

यामुळे आज आपण साप घरात घुसू नये यासाठी कोणते उपाय केले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. पावसाळी काळात साप आणि कीटकांना घरापासून दूर ठेवण्यासाठी कोणते मार्ग अवलंबले पाहिजे, कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्याच्यामुळे साप घरात घुसणार नाही याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.

Advertisement

साप घरापासून दूर ठेवण्यासाठीचे उपाय

1) तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये किंवा खिडक्यांमध्ये कांदा आणि लसणाचे रोप लावू शकता. घरांच्या बागेत कांदा आणि लसणाचे रोप लावल्यास साप घरात घुसण्याची भीती नाहीशी होणार आहे.

Advertisement

2) याशिवाय तुम्ही तुमच्या किचन मध्ये असणाऱ्या काही पदार्थांचा वापर करूनही सापाला दूर ठेवू शकता. साप घरात शिरू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खिडकी आणि दरवाजांना कांदा आणि लसणाची पेस्ट लावू शकता. असं म्हणतात की कांदा आणि लसणाचा तीव्र वास सापांना सहन होत नाही आणि यामुळे या वासापासून ते नेहमीच दूर राहतात.

3) जाणकार लोकांच्या मते, जर पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला तुमच्या घरात साप घुसेल अशी भीती वाटत असेल तर तुम्ही ब्लिचिंग पावडरची फवारणी करू शकता. तुम्ही याची घरात किंवा घराशेजारील बागेत, अडगळीच्या खोलीत फवारणी करू शकता. तसेच ब्लिचिंग पावडरच्या पाण्याने तुम्ही घराची फरशी देखील पुसू शकता. असे म्हणतात की सापांना ब्लिचिंग पावडरचा वास सहन होत नाही. याच्या वासाने साप दूर पळतात.

Advertisement

4) तसेच दालचिनी पावडर, पांढरा विनेगर आणि लिंबाचा रस मिक्स करून तुम्ही दररोज याची फवारणी करू शकता. ज्या ठिकाणी साप निघण्याची शक्यता अधिक असते अशा ठिकाणी याची फवारणी केली पाहिजे. या मिश्रणाच्या फवारणीमुळे घरात किंवा घराच्या आजूबाजूस साप फिरकणार सुद्धा नाही.

5) तज्ञ लोक सांगतात की सापांना काही वनस्पतींचा वास अजिबात आवडत नाही. तर काही वनस्पतींची सापांना मोठी भीती वाटते. त्यामुळे सापाच्या वनस्पतींपासून चार हात लांबच राहतात. अशीच एक वनस्पती आहे सर्पगंधा. सर्पगंधा या वनस्पतीचा तीव्र वास सापांना सहन होत नाही. यामुळे साप अशा वनस्पतींपासून दूर राहतात. तुम्ही ही वनस्पती जर तुमच्या परसबागेत, अंगणात, खिडक्यांमध्ये, बाल्कनीत लावली तर साप घरात किंवा घराशेजारी येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.

Advertisement

6) जर तुम्हाला सर्पगंधा सापडले नाही तर तुम्ही निवडुंग, स्नेक प्लांट, तुळशीचे झाड, लेमन ग्रास अशा वनस्पतींची लागवड करू शकता. या वनस्पतींपासूनही साप दूर राहणे पसंत करतो.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *