Snake Interesting Facts : राज्यासह संपूर्ण भारतात आणि जगात सापांबाबत अनेक समज आणि गैरसमज पाहायला मिळतात. खरतर सर्वसामान्य लोकांना सापांबद्दल फारच कमी माहिती असते. समाजात यामुळे काही चुकीचे गैरसमज देखील पाहायला मिळतात.
विशेषता सापांच्या मिलनाबाबत वेगवेगळे समज आणि गैरसमज समाजात पसरलेले आहेत. शिवाय, पौराणिक कथा आणि दंतकथांमध्ये त्यांच्या प्रेमाच्या कथा देखील सांगितल्या गेल्या आहेत.
विविध प्राण्यांमध्ये प्रेम आणि प्रणय वेगवेगळ्या प्रकारे घडत असते. सापांच्या बाबतीत मात्र परिस्थिती थोडी वेगळी असते. सापांच्या प्रणय आणि त्यांच्या वीण प्रक्रियेचे अनेक पैलू असतात.
आधीच सापांना लोक घाबरतात. यामुळे, सापांबाबत सर्वसामान्यांना खूपच कमी माहिती असते. सापांच्या मिलनाबाबत तर लोकांना अजिबातचं माहिती नसते. यामुळे आज आपण सापांमध्ये मिलन कसे होते.
सापांमध्ये रोमान्स कसा होतो ? मादी साप नर सापाला कसा आकर्षित करतो ? याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर, साप हे बिनविषारी, निमविषारी आणि विषारी असतात. सर्वच साप विषारी नसतात.
पण काही साप विषारी असतात, यामुळे सर्वसामान्यांमध्ये सापांबाबत मोठी भीती असते. पण तुम्हाला माहिती आहे का साप हे देखील इतर प्राण्यांप्रमाणेच मिलन करत असतात. ते देखील इतर प्राण्यांप्रमाणेच रोमांस करतात.
तज्ञ लोकांनी सांगितल्याप्रमाणे, नर आणि मादी साप हे रोमान्स करतात. पण त्यांची रोमांस करण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी असते. मिलन करण्यापूर्वी अर्थातच रोमान्स करण्यापूर्वी साप एकमेकांना आकर्षित करतात.
असे सांगितले जाते की, साप वसंत ऋतू मध्ये सर्वाधिक मिलन करतात. वसंत ऋतुमध्य संभोग करणे सापांना आवडते. पण काही साप अलैंगिक पद्धतीने देखील प्रजनन करतात.
तथापि, सापांची लैंगिक प्रजनन आणि मिलन, संभोग, रोमान्स याची आपापली एक भूमिका आहे. सर्पमित्रांनी सांगितल्याप्रमाणे मादी साप जेव्हा संभोगासाठी तयार होते तेव्हा ती एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडत असते.
हा गंध नर साप आपल्या जीभेच्या साह्याने ओळखतो. यानंतर मग सापांमध्ये रोमान्स सुरु होतो. अशा तऱ्हेने साप संभोग करतात. म्हणजे नर आणि मादी साप एकमेकांच्या सहमतीने संबंध ठेवतात.