Snake News : साप नाव ऐकलं की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. सापाला पाहून आपण प्रत्येकजण घाबरत असतो. सापाच्या शेकडो, हजारो प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती बिनविषारी असतात तर काही प्रजाती विषारी असतात. आपल्या देशात बिनविषारी तथा विषारी दोन्ही प्रकारचे साप आढळतात.
पण, अनेकजण प्रत्येकच सापाला विषारी समजतात. यामुळे साप दिसला की त्याला मारून टाकण्याचे प्रकार अनेकदा तुम्ही पाहिले असतील. मात्र सापांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
पर्यावरणाचा जर समतोल राखायचा असेल तर साप या प्राण्याचे देखील संवर्धन करणे आवश्यक आहे. सापाच्या अशा काही जाती आहेत ज्या की दुर्मिळ आहेत.
अशा परिस्थितीत कोणताही साप दिसला की त्याच्यावर हल्ला करण्यापेक्षा, त्याला मारण्यापेक्षा सर्प मित्राला बोलवून सापाचा रेस्क्यू करा आणि त्याला जंगलात सोडून द्या. असे केल्यास तुमच्या जीवाला धोका होणार नाही आणि सापाचेही जीवन वाचेल.
धोकादायक विषारी प्राण्यांच्या यादीत सापाचा समावेश होतो यात शंकाच नाही. पण तुम्हाला जगातील सर्वात वेगाने धावणारा साप म्हणजेच सर्वात वेगाने सरपटणारा साप कोणता याविषयी माहिती आहे का? कदाचित तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल.
पण, चिंता करू नका आज आपण जगात सर्वात वेगाने सरपटणारा साप कोणता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जगातील सर्वात वेगाने सरपटणारा साप ?
जगातला सर्वात वेगाने सरपटणारा साप कोणता आहे, तो कुठे राहतो, त्याचे वैशिष्ट्य काय, तो किती स्पीडने धावतो ? यांसारख्या अनेक प्रश्नांची आता आपण माहिती पाहणार आहोत.
जगातला सर्वात वेगाने सरपटणारा साप आहे साईडवाईंडर. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हा साप 29 किलोमीटर प्रति तास या वेगाने सरपटण्यास सक्षम आहे. म्हणजेच या सापाचा स्पीड हा 29 किलोमीटर प्रति तास एवढा आहे.
हा साप एका विशिष्ट पद्धतीत सरपटतो यामुळे याचा स्पीड एवढा जास्त असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा साप नेमका कुठे आढळतो ? आपल्या भारतातही या सापाचे अस्तित्व आहे का ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा साप आपल्या भारतात आढळत नाही.
हा प्रामुख्याने वाळवंटात आढळणारा साप असला तरी देखील भारतातील वाळवंटात याचा वावर पाहायला मिळत नाही. हा साप अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम वाळवंटीय प्रदेशात आणि मेक्सिकोमध्ये मोठ्या प्रमाणात स्पॉट केला जातो.