Snake On Raat Rani Plant : मान्सून 2023 अंतिम टप्प्यात आला आहे. देशातील काही भागांमधून मान्सून माघारी फिरला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. काल हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील जवळपास 45 टक्के भागांमधून मान्सून माघारी फिरला आहे.
विशेष म्हणजे आज आणि उद्या राज्यातील बहुतांशी भागांमधून मान्सून काढता पाय घेणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून माघारी फिरेल असे देखील काही हवामान तज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान यावर्षी मान्सून काळात मोठ्या प्रमाणात सर्पदंशाने जीवितहानी झाल्याच्या घटना महाराष्ट्रात पाहायला मिळाल्यात.
खरतर सर्पदंश फक्त पावसाळ्यातच होतात असे नाही तर इतरही ऋतूमध्ये साप चावतो. मात्र पावसाळ्यात सापाच्या बिळात पाणी जाते आणि तो निवार्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे येतो. बिळातून बाहेर पडतो आणि आश्रय शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करत असतो. याचा परिणाम म्हणून पावसाळ्यात साप चावण्याच्या घटनेत वाढ होते.
यावर्षी देखील असेच पाहायला मिळाले आहे. खरंतर साप कुठेही आढळतो मात्र अनेक लोकांचा असा समज आहे की काही विशिष्ट ठिकाणीच साप अधिक आढळतात. जसे की रात राणीच्या झाडांवर साप आढळतात. दरम्यान आज आपण रात राणीच्या झाडांवर खरंच साप राहतात का आणि राहतात तर यामागे नेमके कारण काय ? याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रातराणीच्या झाडांवर खरंच साप राहतात का ?
मित्रांनो, रातराणीच्या झाडांवर किंवा झाडाच्या आसपास साप आढळण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र यामागे एक शास्त्रीय कारण आहे. खरंतर रातराणीचे झाड खूपच सुवासिक आहे म्हणजे त्याला खूप सुगंध असतो. या सुगंधामुळे या झाडावर फुलपाखरे आणि कीटक मोठ्या प्रमाणात येतात.
शिवाय हे झाड खूपच थंड असते. म्हणजे झाडाच्या आजूबाजू थंडावा आढळतो. अशा परिस्थितीत रात राणीच्या झाडावर तयार होणाऱ्या फुलपाखरांना आणि कीटकांना खाण्यासाठी आणि थंड ठिकाणाच्या शोधात बेडूक तेथे येतात. तुम्ही निरीक्षण करा ज्या ठिकाणी रातराणीचे झाड असेल तिथे तुम्हाला बेडूक नक्कीच पाहायला मिळेल.
झाडांवर फुलपाखरु आणि कीटक असल्याने या कीटकांना खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरडे आणि पाली देखील या झाडांवर पाहायला मिळतात. शिवाय या झाडांवर उंदीर देखील आढळतात. आता उंदीर, बेडूक आणि पाली हे सापाचे अन्न आहे. यामुळे साप अन्नाच्या शोधात रातराणीच्या झाडांकडे आकर्षित होतात.