Snake Viral News : सध्या पावसाळ्याचा सीजन सुरू आहे. या काळात सापाच्या बिळात पाणी शिरते अन साप निवाऱ्यासाठी आणि अन्नासाठी कोरड्या ठिकाणी धाव घेतात. जिथे मानवी वस्ती असते अशा ठिकाणी साप आश्रय आणि अन्न शोधण्यासाठी येतात. यामुळे या काळात सर्पदंशाच्या घटना अधिक होत असतात. एका अधिकृत आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 58 हजाराहून अधिक लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो.

भारतात सापाच्या असंख्य प्रजाती आढळतात. मात्र यातील सर्वच प्रजाती विषारी नसतात. अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या प्रजातीचं विषारी आहेत. पण तरीही दरवर्षी सर्पदंशामुळे भारतातील हजारो लोकांचा मृत्यू होतो. यामुळे, पावसाळ्याच्या सीझनमध्ये नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

Advertisement

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार निसर्गात अशा काही वनस्पती आहेत ज्याकडे साप आकर्षित होत असतो. यामुळे अशा झाडांची घराच्या आजूबाजूला लागवड करणे टाळले पाहिजे. दरम्यान आज आपण साप कोण कोणत्या झाडांकडे आकर्षित होतो याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

या झाडांकडे साप आकर्षित होऊ शकतो

Advertisement

मॉथ ऑर्किड (फॅलेनोप्सिस) : तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑर्किड मधमाश्या आणि फुलपाखरांसारख्या कीटकांना आकर्षित करतात. हे कीटक खाण्यासाठी या ठिकाणी बेडूक उंदीर यांसारखे अनेक प्राणी येऊ शकतात.

बेडूक, उंदीर यांसारखे अन्न शोधत शोधत साप देखील या ठिकाणी येतो. साप ज्या ठिकाणी कीटक क्रियाकलाप असते त्या ठिकाणी अधिक येतात. यामुळे घराजवळ हे झाड लावणे सहसा टाळले पाहिजे.

Advertisement

लेमन बाम : Lemon Balm ला लिंबासारखा सुगंध असतो. पण हा सुगंध कीटकांना आकर्षित करू शकतो. हे झाड अशा कीटकांना आकर्षित करते जे की बेडूक व इतर तत्सम सापाच्या भक्षक प्राण्यांचे अन्न आहे.

यामुळे साप सुद्धा या झाडाकडे आकर्षित होतो. यामुळे हे झाड देखील तुमच्या घरा जवळ लावणे टाळले पाहिजे. हे झाड गार्डनमध्ये आणि बाल्कनी मध्ये लावण्याचा ट्रेंड आहे. मात्र याकडे साप आकर्षित होण्याची भीती असते.

Advertisement

होस्टास : होस्टास हे अगदी दाट, छायादार असे शोभेचे झाड आहे. याची लागवड गार्डन मध्ये केली जाते. काही लोक टेरेस आणि बालकनी मध्ये देखील हे झाड लावतात. पण हे झाड अगदी दाट आणि छायादार असल्याने यामध्ये लहान प्राणी लपतात.

यात छोटे कीटक, बेडूक, उंदीर असे छोटे प्राणी लागतात. हे प्राणी निवारा आणि अन्नाच्या शोधात या झाडाकडे येतात. मात्र हेच प्राणी खाण्यासाठी साप देखील तेथे येऊ शकतात. यामुळे हे झाड देखील घराच्या आजूबाजूला नसावे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *