Snake Viral News : भारतात दरवर्षी सर्पदंशाच्या हजारो, लाखों घटना घडत असतात. एका अधिकृत आकडेवारीनुसार, आपल्या भारतात दरवर्षी जवळपास 58 हजार लोक सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडतात. विशेष म्हणजे ही अधिकृत आकडेवारी आहे, प्रत्यक्षात यापेक्षाही अधिक लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होत असावा असा अंदाज आहे. खरे तर भारतात सापाच्या अनेक प्रजाती आढळतात.

मात्र या सर्वच प्रजाती विषारी नसतात. यातील बहुतांशी प्रजाती ह्या बिनविषारी आहेत. काही मोजक्याच प्रजाती या विषारी असून या प्रजातीच्या दंशामुळे माणसाचा मृत्यू होतो. मात्र साप कोणताही असला तरी देखील आपण सर्वजण सापाला घाबरतो.

Advertisement

आपल्या भारतात तर सापा बाबत अनेक कथा प्रचलित आहेत. अनेक दंतकथा सापांवर आधारित आहेत. अशाच काही कथांमध्ये साप हा माणसाचा पाठलाग करतो, साप बदला घेण्यासाठी माणसाला दंश करतो असा दावा केला जातो.

ग्रामीण भाग असो की शहरी भाग सर्वत्र सापांबाबत अशाचं चर्चा असतात. पण खरंच या चर्चांमध्ये काही तथ्य आहे का? याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तज्ञ सांगतात की साप हा जेव्हा त्यांना धोका वाटतो तेव्हाचं हल्ला करतात.

Advertisement

मात्र साप माणसांचा पाठलाग करून हल्ला करतात अशा दाव्यावर तज्ञांचा विश्वास नाहीये. तज्ञ लोक असा दावा खोटा असल्याचे म्हणतात. सापांची माणसाकडे येण्याची इच्छा नसते. महत्त्वाचे म्हणजे माणूस हा सापांची शिकार नाही. अर्थातच माणसांवर हल्ला करण्याचा सापांचा हेतू नसतो.

जेव्हा माणूस सापाला डिवचतो तेव्हाच तो हल्ला करतो. साप हा आक्रमक नसतो, उलटपक्षी माणसांची चाहूल लागल्यानंतर साप दूर पळतो. जेव्हा सापांना माणसापासून धोका वाटू लागतो तेव्हा मात्र ते हल्ला करतात.

Advertisement

साप माणसावर त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचायचे असते तेव्हाच हल्ला करतात. साप पाहू शकतात मात्र सापांना ऐकू येत नाही. एवढेच नाही तर सापांचा मेंदू हा माणसाप्रमाणे विकसित झालेला नसतो.

सापांचा मेंदू फारसा विकसित नसल्याने सापाला एखाद्या व्यक्तीला लक्षात ठेवून मारणे ही गोष्ट साफ खोटी असून ह्या फक्त काल्पनिक कथा आहेत. एकंदरीत साप माणसाचा पाठलाग करतो आणि बदला घेण्यासाठी दंश करतो अशा ज्या कथा आहेत त्या काल्पनिक असून यामध्ये कोणतेही तथ्य नाहीये.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *