Snake Viral News : सापाच नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांना थंडा घाम फुटतो. सापाला पाहून तर आपली भीतीने गाळण उडते. माणुस कीतीही बलवान असला तरी साप समोर आला की तो बलवान भित्राचं बनतो.
जर आपल्या घरात किंवा अंगणात साप आला तर आपण त्याला दूर पळवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र सापाला दूर घालवण्याच्या नादात अनेकदा लोकांना सर्पदंश देखील होतात.
त्यामुळे जर कधी अंगणात किंवा घरात साप आढळला तर सर्वप्रथम सर्पमित्राला बोलवणे तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. सर्पमित्राला बोलावून घरातील अथवा अंगणातील साप दूर जंगलात सोडायला पाहिजे.
मात्र, जर तुम्हाला साप घरात प्रवेश करायला नको असे वाटत असेल तर यासाठी काय केले पाहिजे? याच विषयी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा काही वस्तू आहेत ज्या घरात असल्या तर साप मुळीच प्रवेश करत नाही. म्हणजेच सापाला काही वस्तूंचा वास अजिबात आवडत नाही.
अशा वस्तूंना साप घाबरतो आणि अशा वस्तू जर घरात राहिल्या तर तो घरात शिरू शकत नाही असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
काही लोकांनी फोरेट नावाची पावडर घरात असल्यास साप प्रवेश करू शकत नाही असे म्हटले आहे. या पावडरच्या वासामुळे साप दूर पळतो असे म्हटले जाते.
याशिवाय काही लोकांनी सापाला रॉकेलचा वास आवडत नसल्याने घरात रॉकेल असल्यास साप घरात येऊ शकत नाही असे सांगितले आहे.
तर दुसरीकडे तज्ञ लोकांनी लसूण आणि कांदा, पुदिना, लवंग, तुळस, दालचिनी, व्हिनेगर, लिंबू आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे अमोनिया वायू या गोष्टींचा वास सापाला अजिबात आवडत नसल्याचे सांगितले आहे.
जर या गोष्टीचा घरातून वास येत असेल तर साप मुळीच घरात प्रवेश करणार नाही असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.