Snake Viral News : भारतात सापाच्या शेकडो प्रजाती आहेत. यातील काही प्रजातीचे साप विषारी आहेत तर काही प्रजातीचे साप बिनविषारी आहेत. तर काही साप नीमविषारी देखील आढळतात. साप विषारी असो किंवा बिनविषारी सापाला प्रत्येकच माणूस घाबरतो. विशेष म्हणजे आपल्या भारतात सापाबाबत मोठ्या भ्रामक कथा देखील पसरलेल्या आहेत.
भारतातील अनेक पौराणिक कथांमध्ये आणि दंत कथांमध्ये सापांचा उल्लेख आढळतो. काही ठिकाणी सापांविषयी थोडेसे योग्य वर्णन आढळते तर काही ठिकाणी सापांविषयी वेगळीच माहिती सांगितलेली आहे.
इच्छाधारी नाग, नागमणी, पुनर्जन्म अशा वेगवेगळ्या कहाण्यांमुळे सापाला पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. तसेच गरोदर स्त्रीने सापाचे दर्शन घेऊ नये म्हणजे सापाला पाहू नये असा समज भारतीय समाजात पाहायला मिळतो. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे.
गरोदर स्त्रीने गरोदर काळात सापाला बघितले तर तिच्या आरोग्यावर कोणताच परिणाम होत नाही. हे फक्त एक उदाहरण झालं अशा अनेक वेगवेगळ्या अंधश्रद्धा आपल्या समाजात पाहायला मिळतात. शिवाय आपल्याकडे आढळणाऱ्या काही सापाच्या प्रजाती विषारी आहेत, त्यामुळे सर्पदंश झाल्याबरोबर दवाखान्यात जाणे आवश्यक आहे.
मात्र आपल्याकडे साप चावल्यानंतर सर्वप्रथम मांत्रिकाकडे घेऊन जातात, जे की पूर्णपणे चुकीचे आहे. दरम्यान आज आपण साप आपल्या घराच्या आजूबाजू भटकू नये यासाठी काय केले पाहिजे याविषयी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे सापाला काही झाडांचा वास अजिबात सहन होत नाही. यामुळे जर घरा बाहेर किंवा बाल्कनीत जर अशा झाडांची रोपे लावलेले असतील तर साप आपल्या घरात प्रवेश करणार नाही असे सांगितले जात आहे.
घराबाहेर कोणते झाड लावले पाहिजे?
असे म्हणतात की, काही झाडे सापाला आकर्षित करतात आणि काही झाडांना पाहून साप दूर पळतात. यामुळे ज्या झाडांना पाहून साप घाबरतो अशा झाडांची घराजवळ लागवड केली पाहिजे. यामध्ये सर्पगंधाचा देखील समावेश होतो.
सर्पगंधाचे झाड जर घराजवळ लावलेले असेल तर घराजवळ साप फिरकणार सुद्धा नाहीत असा दावा केला जातो. मगवॉर्ट हे झाड घराबाहेर लावले तरी साप घराजवळ फिरकणार नाहीत. या झाडाचा सुगंध हा सापाला आवडत नाहीत.
यामुळे या झाडाचा सुगंध आला की साप दूर पळतात. लसुनचा सुगंध देखील सापांना आवडत नाही. लसूणच्या सापापासून साप नेहमी दूर राहतात. घराजवळ कांद्याचे झाड लावले तरीही साप दूर राहतात. एवढेच नाही तर लिंबूच्या झाडांचा वास देखील सापांना आवडत नाही.
लिंबूच्या झाडांचा वास हा खूप दूरवर जातो आणि यामुळे साप घराच्या आजूबाजूला देखील फिरकत नाहीत. याशिवाय सोसायटी गार्लिक याचे झाड देखील सापांना घरापासून दूर ठेवू शकते. यामुळे या झाडाची देखील घराजवळ लागवड केली पाहिजे, असा दावा काही तज्ञ करत आहेत.