Snake Viral News : सध्या पावसाळ्याचा सीजन सुरू आहे. महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर हा अधिक आहे. पण सध्या पावसाळा सिझन सुरू असल्याने साप, विंचू यांसारखे विषारी प्राणी घरांमध्ये शिरण्याचा धोका वाढला आहे. तुम्हालाही तुमच्या घरात साप घुसू शकतात अशी भीती वाटत आहे का? मग तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे.
खरंतर अनेकजण सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. पण तरीही साप घरात घुसु शकतात. विशेषतः ग्रामीण भागात सापांचा धोका जास्त असतो. ज्या ठिकाणी घरांच्या आजूबाजूला जंगलासारखा परिसर असतो किंवा जे लोक शेतात राहतात अशा ठिकाणी साप येण्याची भीती अधिक असते.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. मात्र या सर्वच प्रजाती विषारी नसतात. यातील फक्त काही बोटावर मोजण्याइतक्याच सापांच्या जाती विषारी आहेत. पण असे असले तरी भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो.
एका अधिकृत आकडेवारीनुसार दरवर्षी आपल्या देशात सर्पदंशामुळे 58 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. पण ही एक अधिकृत आकडेवारी आहे प्रत्यक्षात याहीपेक्षा अधिक लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतोय.
यामुळे पावसाळी काळात नागरिकांनी अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. दरम्यान आता आपण घरात किंवा अंगणात साप येऊ नये यासाठी कोण कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
या औषधांच्या फवारणीमुळे साप घराशेजारी फिरकणार नाही
पावसाळ्यात घरात ठिकठिकाणी फिनाइल लिक्विडची फवारणी केली तर साप आत जात नाहीत. तुम्ही फिनाइलने घराची फरशी सुद्धा पुसू शकता. फिनाइलमध्ये कार्बोलिक ॲसिड असते, त्यामुळे घरात साप, विंचू घुसत नाहीत.
याच्या वासामुळे साप, विंचू, कीटक घरात येत नाहीत. तसेच घरातील स्टोअर रूम आणि कचराकुंड्या देखील स्वच्छ केल्या पाहिजेत. पण, जर तुम्ही घराच्या अवतीभोवती सुद्धा फिनाइलची फवारणी केली तर पावसाचे पाणी पडल्यानंतर ते फिनाईल धुतले जाते.
अशा परिस्थितीत तुम्ही फिनाईलऐवजी घराभोवती कार्बोलिक ॲसिड फवारायला हवे. कार्बोलिक ॲसिड पावसाचे पाणी पडले तरीही त्याचे काम करते. म्हणून या ॲसिडची घराशेजारी फवारणी केली तर साप येणार नाहीत.
घराभोवती मूळ कार्बोलिक ऍसिडची फवारणी केली तर त्याचा प्रभाव आठवडाभर टिकतो आणि वास येत राहतो, त्यामुळे साप घरात प्रवेश करत नाहीत. यामुळे पावसाळ्यात दर आठवड्याला या केमिकलंची घराशेजारी फवारणी केली पाहिजे. असे केल्यास घराशेजारी साप फिरणार नाहीत, असा दावा तज्ञ लोकांनी केला आहे.