Snake Viral News : तुम्हालाही सापांची भीती वाटते ना? मग आजची बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर आपल्या भारतात सापाच्या शेकडो प्रजाती आढळतात. मात्र या सर्वच सापाच्या जाती विषारी नाहीयेत. यातील काही मोजक्याच जाती विषारी आहेत. मात्र असे असले तरी आपल्या देशात दरवर्षी सापाच्या चाव्यामुळे म्हणजेच सर्पदंशामुळे 58 हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडत असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे ही अधिकृत आकडेवारी आहे प्रत्यक्षात ही संख्या याहीपेक्षा अधिक असू शकते. हेच कारण आहे की साप विषारी असो किंवा बिनविषारी त्यापासून चार हात लांबच राहिले पाहिजे. सध्या पावसाळ्याचा सिझन सुरू आहे आणि या सीजनमध्ये सापांच्या बिळात पाणी शिरते.
यामुळे साप अन्नाच्या आणि निवाराच्या शोधात अशा ठिकाणी जातात जिथे पाणी येत नाही. अन्नाच्या शोधात अनेकदा साप घरात घुसण्याचीही भीती असते. विशेषतः ज्या लोकांचे घर जंगलालगत असते किंवा जे लोक शेतात राहतात अशा लोकांच्या घरात साप घुसण्याची भीती अधिक असते.
ग्रामीण भागात घरांमध्ये साप घुसण्याचे प्रमाण शहरी भागांच्या तुलनेत अधिक असते. दरम्यान, जर तुम्हालाही तुमच्या घरात साफ घुसू शकतो किंवा घराशेजारी साप येण्याची भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
आज आपण साप घरात घुसू नये किंवा घराशेजारी साप भटकू नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
साप घरात घुसू नये यासाठी काय करावे ?
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, साप घरात घुसू नये किंवा घराशेजारी भटकू नये यासाठी फिनाईलची फवारणी केली पाहिजे. तुम्ही फिनाईल लिक्विडच्या साह्याने घरातील फरशी शकता. तसेच घरातील स्टोर रूम तसेच अडगळीची खोली साफ ठेवली पाहिजे. घरात कचरा राहणार नाही याची काळजी घ्यावी.
जर सापांना घरात लपण्यासाठी जागा असेल तर साप घरात घुसण्याची शक्यता अधिक असते. यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे. तसेच, तुम्ही फिनाईल लिक्विड घरात वापरू शकता. घरातील फरशी या लिक्विडने पुसली जाऊ शकते.
यामुळे घरात साप घुसण्याची शक्यता कमी होते. तसेच तुम्ही तुमच्या घरा शेजारी कार्बोलिक ॲसिडची फवारणी करू शकता. मूळ कार्बोलिक ऍसिडची फवारणी केली तर याचा प्रभाव हा एक आठवडाभर कायम राहतो.
फिनाईल मध्ये देखील हेच एसिड असते. मात्र घराबाहेर जर फिनाईल फवारणी केली आणि पाऊस पडला तर ते धुतले जाऊ शकते. यामुळे घराबाहेर मूळ कार्बोलिक ऍसिड फवारले पाहिजे. यामुळे तुमच्या घराशेजारी सुद्धा साप भटकणार नाहीत.