Solar Panel Subsidy : अलीकडे वाढत्या बिज बिलामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या वीज बिलामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडत चालले आहे. हेच कारण आहे की, आता अनेकजण घराच्या छतावर सोलर पॅनल इंस्टॉल करून वीज बिल शून्यावर आणण्याचा विचार करत आहेत. उन्हाळी दिवसांमध्ये नेहमीच विज बिल वाढत असते. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात एसी, फ्रीज, फॅन, कुलर यांसारख्या उपकरणांचा वापर वाढतो आणि यामुळे वीजबिलात वाढ होत असते.
मात्र जर तुम्हाला तुमच्या घराचे विज बिल शून्यावर आणायचे असेल तर तुम्ही घरावर सोलर पॅनल इंस्टॉल केले पाहिजे. सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला अनुदानाचा देखील लाभ घेता येणार आहे. केंद्र शासन सोलर पॅनलवर सबसिडी देत आहे.
यासाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजना नावाची एक विशेष योजना चालवली जात आहे. या योजनेची सुरुवात अलीकडेच झाली असून या अंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी ग्राहकांना 78 हजार रुपयांचे अनुदान पुरवले जात आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना महिन्याकाठी 300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळावी असे उद्दिष्ट सरकारने डोळ्यापुढे ठेवले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.
दरम्यान आता आपण एक किलो वॅट पासून ते तीन किलो व्हॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते ? अनुदानाचा लाभ घेतल्यानंतर सोलर पॅनल इंस्टॉल करण्यासाठी किती खर्च करावा लागू शकतो याविषयी सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती क्षमतेच्या सोलर पॅनल साठी किती अनुदान?
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या माध्यमातून एक किलो वॉट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 30 हजार, 2 किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 60,000 आणि 3 किलोवॉट क्षमतेचे किंवा तीन किलोवॅटपासून ते दहा किलोवॉट पर्यंतच्या क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे.
तुम्ही किती किलो वॅटचे सोलर पॅनल बसवाल?
पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवल्यास प्रत्येक महिन्याला 120 युनिट वीज तयार होऊ शकते. यामुळे जर तुमचा शंभर ते 120 युनिट पर्यंतचा वापर असेल तर तुम्ही एक किलोवॉट क्षमतेचे सोलर पॅनल इंस्टॉल केले पाहिजे.
महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर होत असेल तर तुम्ही दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवायला काही हरकत नाही. जर, दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर होत असेल तर तुम्ही दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते. सोलर सिस्टम बसवली पाहिजे.
सोलर सिस्टम बसवण्यासाठी किती खर्च येतो
एक किलो वॅट सोलर सिस्टम बसवण्यासाठी अंदाजे 52 हजाराचा खर्च येतो. यासाठी 100 चौरस फूट जागेची आवश्यकता असते. दोन किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी एक लाख 5000 पर्यंतचा खर्च करावा लागू शकतो आणि यासाठी 200 चौरस फूट जागेची आवश्यकता भासते.
तीन किलोमीटर क्षमतेचे सोलर पॅनल इंस्टॉल करण्यासाठी एक लाख 57 हजार पर्यंतचा खर्च करावा लागू शकतो आणि यासाठी 300 चौरस फूट पर्यंतची जागा लागू शकते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की सोलर पॅनल साठी लागणारा हा खर्च अनुदान सोडून आहे. अनुदान पकडून ही किंमत आणखी कमी होणार आहे.