State Bank Of India Poultry Farming Loan : भारतात शेती सोबतच पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालन व्यवसायात गाई-म्हशींचे संगोपन मोठ्या प्रमाणात होते. यासोबतच अलीकडे कुक्कुटपालन देखील मोठ्या प्रमाणात केल जाऊ लागल आहे.
शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने पोल्ट्री फार्मिंग उद्योग आता मोठा विस्तारला आहे. चिकन, अंड्याची वाढती मागणी पाहता हा व्यवसाय करणे आता शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. हेच कारण आहे की ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय केला जाऊ लागला आहे.
तथापि हा व्यवसाय सुरू करणे प्रत्येकच शेतकऱ्याला शक्य होत नाही. या व्यवसायातून चांगली कमाई होत असली तरी देखील हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च सुद्धा करावा लागतो. प्रत्येकच शेतकऱ्याला एवढी मोठी अमाऊंट जमवता येत नाही.
यामुळे शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय करता यावा यासाठी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआयने शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसबीआय कुक्कुटपालन व्यवसायासाठी व्यवसायाच्या 75% पर्यंतची रक्कम कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देते.
अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नाही अशा शेतकऱ्यांना एसबीआय कडून लोन घेऊन हा व्यवसाय सुरू करता येणार आहे. दरम्यान आता आपण एसबीआय कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती लाखांचे कर्ज देते आणि यासाठी अर्ज कसा करावा लागतो याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एसबीआय किती कर्ज देते
एसबीआयकडून व्यवसायाच्या 75 टक्के एवढी रक्कम कर्ज स्वरूपात मिळते. व्यवसायासाठी लागणारी उर्वरित 25 टक्के रक्कम मात्र संबंधित व्यक्तीला स्वतः जमा करावी लागते.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यवसायासाठी एसबीआय कडून जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. तसेच हे कर्ज फेडण्यासाठी तीन ते पाच वर्षांचा लोन टेन्यूर मिळतोय. म्हणजेच हे कर्ज तीन ते पाच वर्षांच्या काळात फेडावे लागते. या कर्जासाठी 10.75 टक्के एवढा व्याजदर एसबीआय कडून आकारला जातो.
एसबीआय कुक्कुटपालन लोनसाठी अर्ज कसा कराल?
जर आपणास पोल्ट्री फार्मिंग चा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि एसबीआय कडून जर लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला यासाठी एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागणार आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळील एसबीआयच्या शाखेत जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला लोन साठी इन्क्वायरी करायची आहे आणि अर्ज करायचा आहे.
अर्ज केल्यानंतर बँकेच्या माध्यमातून तुमचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट चेक केला जाईल आणि जर तुम्ही लोन घेण्यासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला कर्जाची रक्कम थेट तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये मिळेल.नाबार्ड पण देते कर्जकुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच कर्ज देते असे नाही तर नाबार्डकडूनही या व्यवसायासाठी कर्ज मिळवले जाऊ शकते.
नाबार्ड कडून तुम्हाला या व्यवसायासाठी कमाल 27 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. तुम्हाला नाबार्डकडून किमान दहा हजार पक्षी असलेल्या पोल्ट्री फार्मसाठी कर्ज मिळू शकणार आहे. नाबार्डकडून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला नाबार्डच्या https://www.nabard.org/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे.