State Employee New Pay Commission : सध्या संपूर्ण देशभरात आठवा वेतन आयोगाबाबत चर्चा रंगली आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तथा महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. सातवा वेतन आयोग हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2016 मध्ये बहाल करण्यात आला होता. आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता तर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो. यामुळे आठवा वेतन आयोग 2026 पर्यंत लागू होणे अपेक्षित आहे.
परंतु यासाठी आठवा वेतन आयोगाची समिती स्थापित करावी लागणार आहे. ही समिती यंदा जर स्थापित झाली तर पुढील दोन वर्षात आठवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात लागू करणे शक्य होणार आहे. यामुळे आठवा वेतन आयोगाबाबत सरकार केव्हा निर्णय घेणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
अशातच मात्र महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील श्रमिक विद्यापीठ नागपूर येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे.
या संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सध्या स्थितीला पाचवा वेतन आयोग अंतर्गत वेतन दिले जात होते. मात्र आता या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग अंतर्गत वेतन दिले जाणार आहे. खरे तर या संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
यानुसार आता श्रमिक विद्यापीठ नागपूर येथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय 18 मार्च 2024 ला राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केला आहे.
सदर शासन निर्णयात असे नमूद करण्यात आले आहे की, श्रमिक विद्यापीठ नागपूर या संस्थेतील एक जानेवारी 2006 पासून कार्यरत असलेल्या व तदनंतर सेवानिवृत्त झालेल्या अधीक्षक/लेखापाल, लघु टंकलेखक आणि शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला पाचवा वेतन आयोग अंतर्गत अधीक्षक/लेखापाल संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांना 5000-8000 अशी वेतन श्रेणी लागू होती, पण आता सहाव्या वेतन आयोगानुसार 9300-34800/- ग्रेड पे 4200 लागू होणार आहे.
लघु टंकलेखक या संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग अंतर्गत 4000-6000 अशी वेतन श्रेणी लागू होती, पण आता या संवर्गातील कर्मचाऱ्यांना 5200-20200/- ग्रेड पे 2400 अशी नवीन वेतन श्रेणी लागू होणार आहे.
शिपाई या संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग अंतर्गत 2550-3200/- अशी वेतन श्रेणी लागू होती मात्र आता या शिपाई संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग अंतर्गत 4440-7440/- ग्रेड पे 1300 ही सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे.
यामुळे या सदर आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. या सदर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देखील दिली जाणार आहे.