State Employee News : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्टी संदर्भात आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना आता अतिरिक्त तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
वर्ष 2024 या कॅलेंडर वर्षात या तीन सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. जिल्हाधिकारी महोदय यांनी त्यांना प्राप्त झालेल्या विशेष अधिकारांचा वापर करत या सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना या सुट्ट्या लागू राहणार आहेत. फक्त जिल्ह्यातील न्यायालयीन व बँकिंग कर्मचाऱ्यांना या सुट्ट्यांचा लाभ मिळणार नाही.
इतर सर्व कर्मचाऱ्यांना मात्र या सुट्ट्यांचा लाभ राहणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना वर्ष 2024 मध्ये तीन अतिरिक्त सुट्ट्या मिळणार आहेत.
साहजिकच यामुळे सदर सरकारी नोकरदार मंडळीला मोठा दिलासा मिळणार अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी महोदय यांनी घेतलेल्या या निर्णयाचे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
दरम्यान, आता आपण उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्या तीन दिवसांसाठी स्थानिक सुट्ट्या तयार झाल्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
कोणत्या तारखांना राहणार स्थानिक सुट्ट्या
यंदा अर्थातच 2024 च्या कॅलेंडर वर्षात जळगाव जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा रक्षाबंधन 19 ऑगस्टला असून या दिवशी जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी राहणार आहे. तसेच, यंदा पोळ्याच्या दिवशी देखील शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दोन सप्टेंबरला यावर्षी पोळा असून या दिवशी देखील या सदर जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी बहाल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी महोदय यांनी घेतला आहे.
याशिवाय, दिवाळीच्या काळात येणाऱ्या नरक चतुर्दशीला अर्थातच 31 ऑक्टोबरला शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतलेला आहे.