State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर लवकरच 4% डीएवाढीचा लाभ मिळणार आहे. एका प्रतिष्ठित मिडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या अखेरपर्यंत यावर शिंदे-फडणवीस सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यापासून चार टक्के डीएवाढीचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना अनुज्ञय करण्याचा अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या अखेरपर्यंत अर्थातच उद्यापर्यंत निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी देखील नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
सोनिक यांनी याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागाने तयार केला असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मान्यतेसाठी दाखल झाल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे. यामुळे यावर 30 जून पर्यंत निर्णय घेतला जाऊ शकतो आणि DA वाढीचा अधिकृत शासन निर्णय लवकरच राज्य शासन जारी करेल असे सांगितले जात आहे.
याचाच अर्थ जून महिन्याच्या वेतनासोबत तसेच पेन्शन देयकासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा रोखीने लाभ मिळणार असे चित्र तयार होत आहे. जून महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच जुलै महिन्यात जें वेतन मिळेल त्यासोबत महागाई भत्ता वाढीचा रोखीने लाभ मिळणार असल्याच्या चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत.
महागाई भत्ता किती होणार
सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. यात चार टक्के वाढ केली जाणार आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. विशेष बाब अशी की, हा महागाई भत्ता वाढीचा लाभ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय केला जाणार आहे.
याचाच अर्थ जानेवारी ते मे महिन्यापर्यंतची महागाई भत्ता थकबाकी देखील राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यामुळे सध्या महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय केव्हा शासनाकडून निर्गमित होणार याकडेच राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.