State Employee News : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिन्यापासून चार टक्के डीए वाढीचा मोठा निर्णय घेतला आहे. याचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ मिळणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने देशातील अनेक राज्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे.
आपल्या महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के डीए वाढ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर ही वाढ राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.
याचा अद्याप निर्णय झालेला नाही मात्र प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आगामी काही दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे. पण येत्या पाच दिवसात जून महिना संपणार आहे. तरीही जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा लाभ महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये शासन विरोधात रोष पाहायला मिळत आहे.
मात्र आता याचा प्रस्ताव तयार होत असल्याने लवकरच याचा लाभ संबंधितांना दिला जाईल अशी माहिती मुख्य सचिव यांनी दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अशातच मात्र महाराष्ट्र शेजारील राष्ट्र मध्यप्रदेश मधून एक मोठी माहिती समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश मधील राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला आहे.
याची घोषणा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. म्हणजेच आता तेथील राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. सध्या या कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. पण आता 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय राहील असे देखील सांगितले जात आहे.
अर्थातच या संबंधित कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. मध्यप्रदेश शासनाने घेतलेला हा निर्णय तेथील कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच फायद्याचा आहे. दरम्यान या निर्णयानंतर राज्यातही डी ए वाढ लागू करण्यासाठी मागणी जोर धरणार असे सांगितलं जात आहे.