State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात आहे.
महागाई भत्ता म्हणजेच डीए जानेवारी ते जून या सहामाहीसाठी आणि जुलै ते डिसेंबर या सहामाहीसाठी दिला जात असतो. सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना 46 टक्के एवढा महागाई भत्ता लागू आहे.
विशेष म्हणजे या नवीन वर्षात देखील दोनदा डीए वाढवला जाणार आहे. जानेवारी 2024 पासून यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. म्हणजेच हा भत्ता 50 टक्क्यांपर्यंत जाणार आहे.
याबाबतचा निर्णय मात्र मार्च 2024 पर्यंत घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी मात्र राज्यातील काही राज्य कर्मचाऱ्यांसाठी वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने राज्यातील काही कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या मंत्रालयीन विभागातील “लिपिक टंकलेखकांना” हा भत्ता लागू करण्यात आला आहे. या संबंधित कर्मचाऱ्यांना आता दरमहा 5,000 रुपये एवढा ठोक भत्ता दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे या निर्णयाचे अंमलबजावणी या चालू महिन्यापासूनच होणार आहे. या संबंधित कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्यापूर्वीच मोठी भेट देण्यात आली आहे.
परिणामी संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
4 जानेवारी 2024 ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली या बैठकीत हा निर्णय झाला असून याची अंमलबजावणी या चालू महिन्यापासूनच होणार आहे.
मंत्रालयात काम करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण आहे. यामुळे हा ताण लक्षात घेता या संबंधित कर्मचाऱ्यांनीसाठी हा निर्णय झाला आहे.