State Employee News : पुढील महिन्यात दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. यंदा 12 नोव्हेंबर पासून दिवाळीचा सण सुरू होणार आहे. यामुळे सध्या नागरिकांमध्ये मोठे प्रसन्न वातावरण आहे. एकीकडे, राज्यात नवरात्र उत्सवाची धूम आहे तर दुसरीकडे पुढील महिन्यात दिवाळी सण येत असल्याने बाजारांमध्ये मोठीचमक पाहायाला मिळत आहे.
दरम्यान, दिवाळी सणाच्या पूर्वीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकार दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही कर्मचाऱ्यांना सण अग्रीम देणार आहे. सण अग्रीम म्हणून कर्मचाऱ्यांना तब्बल 12,500 रुपये दिले जाणार आहेत. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा सण गोड होणार असल्याचे बोलले जात आहे.
कोणाला मिळणार लाभ
शिंदे सरकारने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी सण अग्रीम देण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना शिंदे सरकारकडून 12500 रुपये एवढी सण अग्रीम रक्कम दिली जाणार आहे.
पण ही सण अग्रीम रक्कम महामंडळातील ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन ४३४७७ अथवा त्यापेक्षा कमी आहे अशाच तृतीय आणि चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. याशिवाय गेल्यावर्षीप्रमाणे अर्थातच 2022 प्रमाणेच एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून पाच हजार रुपये देखील दिले जाणार आहेत.
गेल्यावर्षीही सानुग्रह अनुदान म्हणून पाच हजार रुपये वितरित करण्यात आले होते. यंदा देखील शिंदे सरकारकडून ही रक्कम एसटी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. सोबतच एसटी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात पैशांची चणचण भासू नये यामुळे महिन्याचा पगार देखील दिवाळीच्या पूर्वीच केला जाईल असे वृत्त समोर आले आहे.
त्यामुळे एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा यंदाचा दिवाळीचा सण गोड होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.