State Employee News : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट या संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी संदर्भात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्यूटीची रक्कम मिळणे अपेक्षित आहे.
पण उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या तथा मयत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम मिळत नव्हती. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील 122 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम मिळावी यासाठी कामगार न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणात कामगार न्यायालयाने राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला संबंधित कर्मचाऱ्यांना तथा त्यांच्या वारसांना ग्रॅच्युइटीची रक्कम देण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना लवकरच ग्रॅच्युईटीची रक्कम मिळणार अशी आशा व्यक्त होत होती. सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्यूटीची रक्कम मिळणे हा या संबंधित कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे.
मात्र, राज्य शासनाने तथा धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेने कामगार न्यायालयाच्या या आदेशावर कारवाई न करता, या संदर्भात अंमलबजावणीची कारवाई न करता, सदर कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम देण्याऐवजी या विरोधात औद्योगिक न्यायालयात अपील दाखल केली.
त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. दरम्यान या अपीलवर औद्योगिक न्यायालयाने सुनावणी घेतली असून सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या आणि मयत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रक्कम पहिले कोर्टात जमा करा यानंतरच अपील प्रकरणी कारवाई होईल असे म्हणत सदर अपील फेटाळून लावली आहे.
त्यामुळे या संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता ग्रॅच्युइटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे या सदर कर्मचाऱ्यांना तथा त्यांच्या वारसांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
खरे तर या संदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने मोठा पाठपुरावा केला होता. दरम्यान त्यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून या सदर कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
सेवा निवृत्तीनंतर उपदानाची रक्कम मिळणे हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार असून आधी सर्वोच्च न्यायालय आणि यानंतर कामगार न्यायालयाने तथा औद्योगिक न्यायालयाने देखील याच बाबीवर शिक्कामोर्तब केले आहे.
यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून लवकरात लवकर ग्रॅच्युइटीची रक्कम मिळावी अशी आशा या निमित्ताने व्यक्त केली आहे.