State Employee News : काल 19 सप्टेंबर 2023, गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 अर्थातच अनंत चतुर्थी पर्यंत गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. यामुळे सबंध भारत वर्षात मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण यावेळी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. यापूर्वी हा महागाई भत्ता 38 टक्के एवढा होता.
मात्र जानेवारी महिन्यापासून महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. याचा शासन निर्णय मात्र मार्च महिन्यात जारी करण्यात आला होता. सदर शासन निर्णयानुसार, मार्च महिन्याच्या वेतनासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला. सोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आली.
अशातच आता जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र शासन जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात आणखी तीन टक्के वाढ करणार आहे. सध्या 42 टक्के एवढा महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये आणखी तीन टक्के अर्थातच 45 टक्के एवढा महागाई भत्ता होणार आहे.
दरम्यान याबाबतचा निर्णय या चालू महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनाच्या वित्त विभागाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवणे बाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आता फक्त या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे मागीलवर्षी देखील सप्टेंबर महिन्यातच जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली होती. अशा परिस्थितीत यावर्षी देखील या चालू महिन्यातच याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा मोठा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. मात्र, अद्याप शासनाकडून याबाबत कोणतीच अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली नाही.