State Employee News : नववर्ष सुरु होण्यास अवघा सात ते आठ दिवसांचा काळ बाकी आहे. यानंतर 2024 ला सुरुवात होणार आहे. येणारे नवीन वर्ष हे निवडणुकीचे वर्ष राहणार आहे. यामुळे येत्या नवीन वर्षात शासनाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले जाणार आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील शासन विविध निर्णय घेणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, येत्या नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पूर्ण होणार आहे. ती म्हणजे पुढील वर्षी नवीन वेतन आयोगासाठीची समिती स्थापित केली जाणार आहे.
समितीची स्थापना झाल्यानंतर मग तेथून दोन वर्षांनी अर्थातच 2026 मध्ये नवीन वेतन आयोग अर्थातच आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना लागू होईल अशी माहिती प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.
खरंतर चालू वर्षे अर्थातच 2023 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास राहिले आहे. या चालू वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा तब्बल आठ टक्के महागाई भत्ता वाढला आहे.
पहिल्या सहामाहीत चार टक्के आणि दुसऱ्या सहामाहीत 4% असा एकूण आठ टक्के महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढला आहे. दरम्यान येणारे नवीन वर्षे हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी याहून अधिक खास राहणार आहे.
कारण की येत्या नवीन वर्षात पहिल्या सहामाहीत तब्बल पाच टक्के महागाई भत्ता वाढवला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. त्याशिवाय पुढील वर्षी आठवा वेतन आयोगाची स्थापना देखील केली जाणार आहे.
मात्र प्रत्यक्षात नवीन वेतन आयोगाचा लाभ 2026 मध्येच मिळण्याची शक्यता आहे. तथापि आज आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढेल याबाबत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वाढणार पगार ?
मीडिया रिपोर्टनुसार, नवीन वेतन आयोग अर्थात आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढू शकतो. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 8000 रुपयाने वाढणार आहे.
सध्या या सदर मंडळीचा किमान मूळ पगार अठरा हजार रुपये आहे मात्र फिटमेंट फॅक्टर वाढल्यानंतर हा पगार 26000 वर जाणार आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य शासनात कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा विचार केला असता त्यांचा किमान मूळ पगार 15000 वरून थेट 21000 होणार आहे. म्हणजेच त्यांच्या पगारात सहा हजाराची वाढ होईल अशी शक्यता आहे.